ETV Bharat / city

Anil Deshmukh Meet Sachin Waze चांदीवाल आयोगात अनिल देशमुख -सचिन वाझे यांची भेट

author img

By

Published : Nov 30, 2021, 3:19 PM IST

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपानंतर राज्य सरकारकडून चांदीवाल आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगाकडे आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीकरिता ( Anil Deshmukh probe in Chandiwal commission ) बोलविण्यात आले होते. आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर सचिनचे आणि अनिल देशमुख यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अनिल देशमुख  सचिन वाझे यांची भेट
अनिल देशमुख सचिन वाझे यांची भेट

मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज चांदिवली आयोगाकडे ( Anil Deshmukh probe in Chandiwal commission ) चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे या ( Anil Deshmukh meeting with Sachin Waze ) दोघांमध्ये दहा मिनिटात चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपानंतर राज्य सरकारकडून चांदीवाल आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगाकडे आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीकरिता बोलविण्यात आले होते. आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर सचिनचे आणि अनिल देशमुख यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आजचे चांदीवाल आयोगाचे कामकाज स्थगित करून उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

हेही वाचा-Param Bir Singh's Warrant Cancelled : परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट रद्द

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सचिन वझे यांची सोमवारी ( Sachin Waze meeting with Param Bir Singh ) आयोगाकडून चौकशी करण्यात आली. त्यावेळीदेखील आयोगाचे कामकाज संपल्यानंतर आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर बंद खोलीमध्ये एक तास चर्चा झाली होती. त्या चर्चेला विरोध दर्शवित अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. मात्र, तरीदेखील आज अशाच प्रकारे पुन्हा एक भेट झाल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा-Anil Deshmukh : अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर कुटुंबासह दाखल

दोघांमध्ये तासभर चर्चा

सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांनी केबिनमध्ये बसून सुमारे तासभर चर्चा ( Sachin Waze probe in Chandiwal commission ) केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर मुंबई पोलीस या भेटीचा तपास करणार आहेत. या भेटीसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले. अशा प्रकारे दोघांना भेटण्याची परवानगी कुणी दिली आणि त्या भेटीत नेमके काय झाले, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-Param Bir Waze Meeting : सिंग-वाझे भेटीबाबत चौकशीचे आदेश - गृहमंत्री वळसे

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.