चंद्रपूर - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वन मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. जिल्ह्यातील अतिप्रदुषीत क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. प्रामुख्याने प्रदूषण निर्माण होणाऱ्या कोळसा खाणी, औष्णिक वीज केंद्रे, धूळ आदींमधून निर्माण होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठीचे मुद्दे अग्रस्थानी होते. राज्यातील औष्णिक वीज केंद्रातील प्रदूषण नियंत्रणाबाबत उर्जा मंत्री आणि उर्जा विभागाबरोबर नुकतीच बैठक घेऊन चर्चा करण्यात आली असून त्याच प्रार्श्वभूमीवर एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांबरोबरही समन्वय करुन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणाचे नियोजन करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण रोखा, पर्यावरण मंत्र्यांचे आवाहन
पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वन मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. जिल्ह्यातील अतिप्रदुषीत क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रण करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. प्रामुख्याने प्रदूषण निर्माण होणाऱ्या कोळसा खाणी, औष्णिक वीज केंद्रे, धूळ आदींमधून निर्माण होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठीचे मुद्दे अग्रस्थानी होते.