ETV Bharat / city

बेस्ट'च्या मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत, बेस्ट प्रशासनाची माहिती

author img

By

Published : Jul 1, 2021, 9:28 PM IST

'बेस्ट'च्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्याचे महापालिकेने घोषीत केले होते. त्यानुसार मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

बेस्ट बस
बेस्ट बस

मुंबई - सगळीकडे जसा कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. तसाच, मुंबईमध्येही गेल्या वर्षाभराहून अधिक काळ कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. यासाठी सगळीकडे लॉकडाउन लावण्यात आला. दरम्यानच्या काळात अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचवण्याचे काम बेस्ट कर्मचारी करत आहेत. दरम्यान, बेस्टच्या १०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्याचे महापालिकेने घोषीत केले होते. त्यानुसार मृत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

बेस्ट लाईफलाईन

मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन लावण्यात आले. त्यानंतर लोकल ट्रेन बंद करण्यात आली. लोकल ट्रेन बंद झाल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचवण्याचे काम बेस्टवर सोपवण्यात आले. बेस्टचे कर्मचारी मुंबईसह बाजूच्या जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहचवचण्याचे आणि घरी पोहचवण्याचे काम करत होते. लॉकडाउनला शिथिलता दिल्यावर सामान्य नागरिकांना बेस्टमधून प्रवासाची मुभा देण्यात आली. यामुळे बेस्ट मुंबईकरांची पहिली लाईफलाईन बनली आहे. आजही बेस्टमधून सुमारे २० लाख मुंबईकर प्रवास करत आहेत.

३४८२ कर्मचाऱ्यांना कोरोना

मार्च (२०२० ते ३० जून २०२१)पर्यंत बेस्टच्या ३ हजार ४८२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यातील ३ हजार ३५८ म्हणजे, ९६ टक्के कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १३ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील २ कर्मचारी ऑक्सीजनवर उपचार घेत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५७० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. तर, पहिल्या लाटेत २ हजार ९१२ कर्मचाऱ्यांना बाधा झाली होती.

पालिकेकडून बेस्टला आर्थिक मदत

केंद्र सरकारने कोरोना दरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटंबीयांना, वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. मात्र, काही आरोग्य कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ देण्यात आला. यामुळे मुंबई महापालिका आयुक्तांकडे मृत पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना मदत करावी अशी मागणी झाली. त्यानुसार पालिका आयुक्तांनी बेस्टच्या मृत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाखांची मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही आर्थिक मदत देण्यात आली आहे. दरम्यान, ३,४८२ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. ३,३५८ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. ११ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. तर, २ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.