ETV Bharat / city

...अन्यथा महाराष्ट्रातही भडका उडेल; दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीवेळी राजू शेट्टींचा इशारा

author img

By

Published : Dec 12, 2020, 10:12 PM IST

Updated : Dec 12, 2020, 10:23 PM IST

दिल्ली येथील आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भेट दिली. या वेळी बोलताना त्यांनी जर केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रातूनसुद्धा आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा दिला.

Raju Shetty visited the farmer agitation
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास राजू शेट्टींची भेट; सरकारला दिला 'हा' इशारा

कोल्हापूर - दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलन हे फक्त पंजाब, उत्तरप्रदेश व उत्तराखंड राज्याचे नाहीये तर काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंतचे सर्व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा देश अशांत झाला तर कोणालाही कारभार करता येणे अवघड होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गाजीपूर बॉर्डर दिल्ली येथील किसान आंदोलनात दिला. दिल्ली येथील गाजीपूर बॉर्डर जवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आज शेट्टींनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्रातून मेधा पाटकर आणि प्रतिभा शिंदेसुद्धा उपस्थित होत्या.

केंद्र सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा -

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने संपुर्ण देशभर आंदोलन जोर धरू लागले आहे. केंद्र सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि त्यांना मान्य नसलेले जे कायदे आहेत, ते मागे घ्यावेत. हमीभाव कायदेशीर करावा, हाच यावरचा पर्याय आहे. शेतकरी ज्या हमीभावाच्या कायद्याची मागणी करत आहे, तो कायदा न आणता ज्या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांची लुट होईल तो कायदा केंद्र सरकार वारंवार शेतकऱ्यांच्या भल्याचे कायदे असल्याचे सांगत आहे. जर हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्याचे असते तर देशात सुरू असलेल्या या आंदोलनात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले नसते, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

तर महाराष्ट्रातूनसुद्धा आंदोलनाचा भडका उडले -

सरकारने शेतकऱ्यांच्या अंत पाहू नये. इथे कडाक्याच्या थंडीत शेतकरी आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत. तरीही गेंड्याच्या कातडीचे सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. जर केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रातून सुद्धा आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा शेट्टींनी दिल्ली येथील गाजीपूर बॉर्डर जवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात दिला.

Last Updated : Dec 12, 2020, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.