ETV Bharat / city

Aurangabad Bank Loan Recovery : थकीत कर्ज वसुलीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची 'गांधीगिरी पद्धत'

author img

By

Published : Feb 3, 2022, 11:52 PM IST

Updated : Feb 4, 2022, 2:07 PM IST

बँकेमार्फत गांधीगिरी आंदोलन ( Gandhigiri Movement Through Banks ) केले जात आहे. यामध्ये थकबाकी खातेदाराच्या घरासमोर कर्ज परतफेडीबाबत बँक कर्मचारी फलक घेऊन, थकबाकीदाराला गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करत आहेत. तर कधी पथनाट्य करून ( Loan Recovery by Doing Street Plays ) बँकेने कर्ज देऊन कशी मदत केली याबाबत सांगून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी
महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्मचारी

औरंगाबाद - बँकेने दिलेले कर्ज परत मिळाव यासाठी वसुली पथक नेमले जातात किंवा इतर उपाययोजना केल्या जातात. तरीदेखील दिलेले थकबाकी वसूल ( Loan Recovery ) होईल याची शाश्वती नसते. त्यामुळेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ( Maharashtra Gramin Bank Gandhigiri Scheme ) गांधीगिरी योजना राबवत वसुलीचा प्रयत्न सुरू केला आहे. पथनाट्य करून, ( Doing Street Plays ) तर कधी हातात फलक घेऊन बँक कर्मचारी थकबाकीदाराच्या दारात उभे राहून पैसे भरण्याची विनंती करत आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेची 'गांधीगिरी पद्धत'
  • थकबाकी वसुलीसाठी उपाय योजना

महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एकूण कर्ज येणे रू 8200 कोटी असुन त्यापैकी रू 650 कोटीची एनपीए थकबाकीत आहेत. कर्जवसुली करण्यासाठी बँकेकडून नेहमी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये व्याज दरावर सवलत देणे, थकबाकी दारांना लावलेल्या दंडाच्या रकमेत सूट देणे, पैसे भरण्यासाठी वेळ देणे असे उपाय नेहमी केले जातात. मात्र वसुलीला अनेक कर्जदार प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढत जाते आणि त्याचा परिणाम पुढील कर्जवाटप किंवा इतर नियोजनावर होतो.

  • थकबाकी वसुलीसाठी गांधीगिरी

मराठवाड्यातील विविध भागात महाराष्ट्र ग्रामीण बँकेची थकबाकी असुन, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज परतफेड व पुन्हाकर्ज यासाठी बँकेमार्फत गांधीगिरी आंदोलन केले जात आहे. यामध्ये थकबाकी खातेदाराच्या घरासमोर कर्ज परतफेडीबाबत बँक कर्मचारी फलक घेऊन, थकबाकीदाराला गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करत आहेत. तर कधी पथनाट्य करून बँकेने कर्ज देऊन कशी मदत केली याबाबत सांगून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर बँकांच्या योजनांची माहिती यानिमित्ताने दिली जात आहे. वैशिष्ट्यपूर्ण वसुली अभियान महाराष्ट्र ग्रामीण बँक औरंगाबाद व जालना जिल्ह्यासह सर्व मराठवाड्यात राबवित आहे. याचा पहिला टप्प्यात औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील गावात राबविला जात असुन त्यामुळेच थकित कर्ज वसुलीस चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अध्यक्ष मिलिंद घारड यांनी दिली आहे.

  • शेतकऱ्यांसाठी बळीराजा तारणहार योजना

महाराष्ट्र ग्रामीण बँक शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटप देऊन मदत करण्याचा प्रयत्न करत असते. मागील दोन वर्षांपासून कोरोनाची परिस्थिती किंवा अन्य अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज परत करणे शक्य झाले नाही. मात्र त्यांच्यासाठी एक विशेष योजना बँकेकडून राबविण्यात येत आहे. "बळीराजा तारणहार योजना" असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमध्ये भरघोस सूट देण्यात येत आहे. इतकेच नाही तर कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने लगेच नवीन कर्ज देण्याची उपाय योजना केली आहे. कर्ज परत करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केल्याची माहिती बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संजय वाघ यांनी दिली आहे.

हेही वाचा - Reactions on BMC Budget 2022 : '"मुंगेरी लाल के हसीन सपने", "गुलाबी स्वप्न" दाखवणारा अर्थसंकल्प'

Last Updated : Feb 4, 2022, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.