ETV Bharat / city

केदारनाथ मंदिरात शंकराचार्य प्रतिमेचे लोकार्पण; घृष्णेश्वर येथे पूजन

author img

By

Published : Nov 5, 2021, 11:44 AM IST

Updated : Nov 5, 2021, 12:06 PM IST

केदारनाथ धाम येथे श्री शंकराचार्य यांच्या समाधी आणि प्रतिमेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले.

केदारनाथ मंदिरात शंकराचार्य प्रतिमेचे लोकार्पण; घृष्णेश्वर येथे पूजन
केदारनाथ मंदिरात शंकराचार्य प्रतिमेचे लोकार्पण; घृष्णेश्वर येथे पूजन

औरंगाबाद : केदारनाथ धाम येथे श्री शंकराचार्य यांच्या समाधी आणि प्रतिमेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. यावेळी धार्मिक स्थळ विकासासाठी प्रयत्नशील असल्याचं मत डॉ भागवत कराड यांनी व्यक्त केलं. तर केदारनाथ दर्शनासाठी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे येणाऱ्या अडचणी कमी झाल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

मोदीजींमुळे केदारनाथांचे दर्शन झाले सोपे2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे केदारनाथ येथे भाविकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. आधी तिथे जाण्यासाठी चांगले रस्ते नव्हते, सुविधा नव्हत्या. त्यामुळे तिथे परत कोणी येईल याची खात्री नव्हती. मात्र आता सर्व सुविधा आहेत. जाण्यासाठी चांगले रस्ते झाले आहेत. मोदीजी एकेकाळी तिथे राहत होते. अनेक वेळा ते दर्शनासाठी गेले. त्यामुळे त्यांची विशेष श्रद्धा केदारनाथवर आहे असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.मराठवाड्यातील ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांचा विकास होणारकेदारनाथ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पूजन केले जात असताना देशातील अनेक धार्मिक स्थळांमध्ये याचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. मराठवाड्यात तीन ज्योतिर्लिंग आहेत त्यांचा विकास करण्याचे नियोजन केले जात आहे. पहिला टप्पा म्हणून वेरूळ येथील विकासकाम सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

Last Updated : Nov 5, 2021, 12:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.