ETV Bharat / city

Amravati Yashomati Thakur PC : 'अमरावतीच्या सांस्कृतिक दर्जाला शोभणारी असावी लोकप्रतिनिधींची वागणूक'

author img

By

Published : Jan 20, 2022, 8:39 PM IST

सांस्कृतिक वैभव असणाऱ्या अमरावतीच्या सांस्कृतिक दर्जाला शोभावी अशीच लोकप्रतिनिधींची वागणूक असावी, असा टोला जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur Critisize Ravi Rana ) यांनी राणा दाम्पत्यांना मारला. गत काही दिवसांपासून शहरात सुरू असणार्‍या घडामोडींचा संदर्भात यशोमती ठाकूर यांनी ( Amravati Yashomati Thakur Press Conference ) आज पत्रकार परिषद घेऊन शहर आणि जिल्ह्यात शांतता राहावी, असे आवाहन केले.

Yashomati Thakur Critisize Ravi Rana
Yashomati Thakur Critisize Ravi Rana

अमरावती - संविधानाचे पालन करणे हे लोकप्रतिनिधींचे आद्यकर्तव्य आहे. अमरावती शहरात मात्र पाच-सहा दिवसांपासून लोकप्रतिनिधीच कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. केवळ आणि केवळ भांडण करणे, वाद घालiणे हाच त्यांचा उद्देश आहे. खरंतर अमरावती ही विदर्भाची सांस्कृतिक आणि शैक्षणिक नगरी आहे डॉ. पंजाबराव देशमुख, संत तुकडोजी महाराज , संत गाडगेबाबा यांची ही पावन भूमी आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या अमरावतीच्या. सांस्कृतिक वैभव असणाऱ्या अमरावतीच्या सांस्कृतिक दर्जाला शोभावी अशीच लोकप्रतिनिधींची वागणूक असावी, असा टोला जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur Critisize Ravi Rana ) यांनी राणा दाम्पत्यांना मारला. गत काही दिवसांपासून शहरात सुरू असणार्‍या घडामोडींचा संदर्भात यशोमती ठाकूर यांनी ( Amravati Yashomati Thakur Press Conference ) आज पत्रकार परिषद घेऊन शहर आणि जिल्ह्यात शांतता राहावी, असे आवाहन केले.

प्रतिक्रिया

'छत्रपतींचा पुतळा सन्मानाने स्थापन व्हावा' -

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अमरावती शहरात स्थापन करण्यास कोणाचाही विरोध नाही. छत्रपती शिवराय हे सर्वांचेच आदर्श आणि सर्वांना आदरणीय आहेत. मात्र, कुठलाही विचार न करता आणि प्रशासकीय मान्यता न घेता राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणे हे योग्य नाही. उड्डाण पुलावरून जाणाऱ्या बसमधील एखाद्या प्रवाशाने बाहेर थुकले तर त्याचे शिंतोडे पुतळ्यावर उडतील, याची तरी जाणीव राखायला हवी. सर्वच गोष्टींचा विचार करून लोकप्रतिनिधींनी वागणे अपेक्षित आहे. अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यासाठी कायद्यानुसार सर्व ती कारवाई करूनच पुतळ्याची स्थापना केली जाईल, असे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.

'तो पुतळा फायबरचा' -

केवळ वाद घालण्याच्या निमित्ताने राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा स्थापन करण्यात आला. तो पंचधातूंचा नव्हे, तर फायबरचा पुतळा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा फायबरचा नको आहे. आम्ही तिवसा शहरात सर्व परवानगी घेऊन नियमानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला आहे. मात्र, भातकुली कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणाला बसवावा वाटला नाही. केवळ लोकांची डोकी भडकावी, याच उद्देशाने काही लोकप्रतिनिधींचे वागणे योग्य नसल्याचेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

'महापालिकेत कुठलाही प्रस्ताव नाही' -

राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी तीन वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली असल्याचे राणा दांपत्याने म्हटले आहे. वास्तवात वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेल्या राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी 3 वर्षांपूर्वी महापालिकेत प्रस्ताव कसा काय सादर करण्यात आला हा एक प्रश्नच आहे. मात्र, आम्ही तरीसुद्धा महापालिकेत अशा प्रस्तावास संदर्भात संपूर्ण चौकशी केली. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास संदर्भात महापालिकेकडे कुठलाही प्रस्ताव सादर करण्यात आला नाही, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

'भरतनाट्यम आणि कथकली करणाऱ्यांनी सावध राहावे'

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मी स्वतः कोरोनाच्या आजारातून दोन दिवस झालेत बरी झाली आहे. विनाकारण कोणी गर्दी करू नये, खरंतर भरतनाट्यम आणि कथकली करणाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे त्यांनी गर्दी जमविणारे कार्यक्रम बंद करावे, असे आवाहन देखील यशोमती ठाकूर यांनी केले.

'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला विरोध नाही'

अमरावती शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यास कोणाचाही विरोध नाही. महापालिका प्रशासनानेही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यास मान्यता दिली आहे. मात्र हा पुतळा स्थापनेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे सध्या अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा शहरात बसवणे कायदेशीर रित्या शक्य नसल्याचे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येत किंचित घट, आज ५७०८ नव्या रुग्णांची नोंद, १२ जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.