अमरावती - मुंबईच्या लालबागच्या राजानंतर विदर्भात प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या राजाची आज सायंकाळी साडेसात वाजता प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. दरम्यान, शहरात गणेशोत्सवामुळे आनंदाचे वातावरण आहे.
शहरातील न्यू आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाचे हे 38 वे वर्ष असून पुढील दहा दिवस याठिकाणी विदर्भाच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी असणार आहे. अमरावतीच्या इर्विन चौकात विदर्भातील प्रसिद्ध असलेला सर्वात उंच असा हा गणपती म्हणून याची ओळख आहे. यावर्षी विदर्भाच्या राजाची ही मूर्ती ३० फूट उंचीची आहे.