अमरावती - कारागृहातील बंदीवान आणि त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या वऱ्हाड संस्थेच्यावतीने कारागृहातील बंदिवानांच्या मुलांसाठी गोवा येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलांसाठी सहलीचा विदर्भातील हा पहिलाच उपक्रम आहे.
वऱ्हाड संस्थेचे अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, १० ते २१ वर्ष वयोगटातील मुले या सहलीला जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत ४५ मुलांना सहलीची संधी मिळत आहे. २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत ही सहल जाणार आहे. विदर्भातील विविध कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या बंदिवानांच्या सहमतीनेच त्यांच्या मुलांना मोफत सहलीचा लाभ दिला जात आहे. प्रवास, निवास आणि भोजन या सर्व खर्चाची जबाबदारी अनप्रेम ग्रुपने स्वीकारली असल्याचेही त्यांनी सांगितले.