ETV Bharat / city

Amravatis Artistes : अमरावतीच्या कलावंतांच्या गाण्याची सोशल मीडियावर धूम

author img

By

Published : Sep 17, 2022, 7:29 PM IST

'मेरे खाबो मे खायलो मे हो तुम' या अमरावतीकर कलावंतांच्या गाण्याची सोशल मीडियावर सध्या धूम पाहायला मिळत आहे. गाण्याचे गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक आणि कलावंत ( Amravatis Artistes ) अशी संपूर्ण टीम ही अमरावतीची असून या गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण देखील अमरावती शहरात झाले आहे. ( Amravatis Artistes Songs Are Popular On Social Media )

Amravatis Artistes Songs
मरावतीच्या कलावंतांच्या गाण्याची सोशल मीडियावर धूम

अमरावती - 'मेरे खाबो मे खायलो मे हो तुम' या अमरावतीकर कलावंतांच्या गाण्याची सोशल मीडियावर सध्या धूम पाहायला मिळत आहे. गाण्याचे गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक आणि कलावंत ( Amravatis Artistes ) अशी संपूर्ण टीम ही अमरावतीची असून या गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण देखील अमरावती शहरात झाले आहे. ( Amravatis Artistes Songs Are Popular On Social Media )

कलावंतांच्या प्रयत्नाने साकारली कलाकृती - अमरावती शहरातील कापड व्यवसायी आणि हौशी कलावंत असणारे रितेश मेहता यांना एक कथानक असल्याचे गाणे निर्माण व्हावे अशी कल्पना सुचली. त्यांनी ही कल्पना अमरावती शहरातील जय बाबा स्टुडिओचे संचालक ऋषी दारा यांच्याकडे मांडली. आजवर अनेक भजन रचणारे आणि त्याला संगीतबद्ध करणारे ऋषी दारा यांनी रितेश मेहता यांची कल्पना समजून घेतली आणि त्या कल्पनेवर आधारित गीत रचले.यानंतर संविधान मनोहरे या गायकाकडून हे गीत गाऊन घेतले.आजवर अनेक भजन गाणारे संविधान मनोहरे यांनी पहिल्यांदाच रोमॅण्टिक पद्धतीचे गाणे गायले.गाणे तयार झाल्यावर आता या गाण्याच्या आधारावर रोमांटीक कथानक रितेश मेहता यांनी रचले आणि सागर उदासी या दिग्दर्शकाकडून सहा ,मिनिटांचा खास अशा म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली.यामध्ये कलावंत म्हणून स्वतः रितेश मेहता आणि मॉडेल खुशबू पटारीया प्रमुख भूमिकेत असून यांच्यासह गिरीश नारायण आणि बेबी रचना यांचा छोटासा अभिनय देखील या संगीत व्हिडिओ पाहायला मिळतो.

लॉकडॉन मध्ये केलेले चित्रीकरण -कोरोना काळात लॉकडाऊन असताना , प्रशासनाची अधिकृत परवानगी घेऊन शहरालागत द्रुतगती महामार्ग तसेच राजकमल चौक, छत्री तलाव लगतचा जंगल परिसर अशा विविध ठिकाणी या म्युझिक व्हिडिओसाठी छायाचित्रण करण्यात आले, विशेष म्हणजे हा संपूर्ण म्युझिक व्हिडिओ पाहताना गाणे,संगीत, एडिटिंग हे सर्व काही जणू मुंबईला एखाद्या स्टुडिओत झाले असावे असाच भास होतो.

पाच सप्टेंबरला प्रदर्शित झाले गाणे - या संपूर्ण म्युझिक व्हिडिओची शूटिंग, एडिटिंग, मिक्सिंग अमरावतीमध्ये झाली असून हे गाणे रिलीज करण्यासाठी रितेश मेहता आणि त्यांच्या चमूने मुंबईतील नामांकित संगीत कंपन्यांकडे विनंती केली.मात्र सुरुवातीला अनेक ठिकाणी त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.असे असताना सध्या देशात आघाडीवर असणाऱ्या एका संगीत कंपनीने त्यांचे गाणे रिलीज करण्यास उत्सुकता दर्शविली , आणि पाच सप्टेंबर रोजी 'मेरे खाबो मेमेरे खाबो मेरे खयालो मे हो तुम' हे गाणे त्या नामांकित कंपनीच्या अधिकृत युट्युबवर झळकले. आज अमरावतीच्या या कलाकृतीला लाखोच्या संख्येत संगीत आणि कला प्रेमींनी पाहिले असून यातला कृतींची संगीतक्षेत्रात प्रशंसा देखील होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.