नवी दिल्ली – रिअलमी स्मार्टफोनचे दोन मॉडेल 18 ऑगस्टला लाँच करणार आहे. रिअलमी सी 12 आणि रिअलमी 15 ही दोन मॉडेल भारतीय ग्राहकांना उद्या खरेदी करता येणार आहेत.
रिअलमी या स्मार्टफोन ब्रँडने ट्विट करत दोन्ही ब्रँडची माहिती दिली आहे. रिअलमी सी 12 आणि रिअलमी सी 15 या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6000 एमएएचची दणकट बॅटरी आहे. बॅटरीची उर्जा वाचविण्यासाठी सुपर पॉवर सेव्हिंगचा पर्याय आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत मोबाईलची बॅटरी वेळेला कामाला येवू शकणार आहे.
हे आहेत रिअलमी सी-12 आणि रिअलमी सी-15 ची वैशिष्ट्ये
- 6000 एमएएच बॅटरी आहे.
- सुपर पॉवर सेव्हिंग मोड ठेवता येतो.
- अडीच तास बोलल्यानंतर 5 टक्के बॅटरी कमी होते.
- मेडियाटेक हेलिओ जी 35 गेमिंग प्रोससर आहे
रिअलमी सी 12 चे वैशिष्ट्ये
- 13 मेगापिक्सेलचा एआय तीन कॅमेराचा सेटअप आहे.
- सुपर सेव्हिंग मोड असलेली 6000 एमएएच बॅटरी आहे.
- 6.5 इंचचा (16.5 सेंमी) फुलस्क्रीन डिसप्ले आहे.रिअलमी स्मार्टफोन
रिअलमी सी 15 चे वैशिष्ट्ये
- 13 मेगापिक्सेलचा एआय क्वाड कॅमेरा सेटअप आहे.
- 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. 18 वॅटची बॅटरी ही लवकर चार्ज होते.
- 6.5 इंच (16.5 सेंमी) फुलस्क्रीन डिसप्ले आहे.रिअलमी स्मार्टफोन