मुंबई - शेअर बाजाराने विक्रमी निर्देशांक गाठून नंतर घसरणीचा 'यू टर्न' अनुभवला आहे. शेअर बाजाराच्या निर्देशांकाने दिवसभरात ३९,५७१.७३ अंशाचा टप्पा गाठला. मात्र शेअर बाजार बंद होण्यापूर्वी निर्देशांकात ३८३ अंशाची घसरण झाली. निफ्टीतही ११९ अंशाची घसरण होवून निर्देशांक ११, ७०९ वर पोहोचला.
मतदान निकालाच्या चाचणीत एनडीए सरकार येण्याची शक्यता वर्तविल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात २०० अंशाने वधारून ३९,५६५ वर स्थिरावला होता.
टाटा मोटर्सची मार्च तिमाहीदरम्यान ४९ टक्के नफ्यात घसरण झाली. या तिमाहीच्या निराशाजनक निकालामुळे टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये ७.०५ टक्क्याने सर्वात अधिक घसरण झाली. मारुती, इंडुसलँड बँक, एम अँड एम, भारती एअरटेल, एसबीआय, पॉवरग्रीड, हिरो मोटोकॉर्प, टाटा स्टील, आयसीआयसी बँक, इन्फोसिस बँक, येस बँक आणि टीसीएसच्या शेअरमध्ये ३.२५ टक्क्यांची घसरण झाली. तर आरआयएल, एचयूएल आणि बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये १.०८ टक्क्याने वधारले.
कच्च्या तेलाच्या बॅरलचे दर हे ०.०४ टक्क्याने वाढून ७२.०१ वर पोहोचले.