नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा 555 रुपयांनी वाढले आहेत. हे दर कमी वाढल्याने सोन्याचा दर प्रति तोळा 45,472 रुपये झाले आहेत. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 44,917 रुपये होता.
सोन्यापाठोपाठ चांदीचे दर वाढले आहेत. चांदीचे दर प्रति किलो 975 रुपयांनी वाढून 58,400 रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 57,425 रुपये होता. शुक्रवारी बाजार खुला होताना रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 12 पैशांनी घसरून 74.35 रुपयांवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अंशत: घसरून 1,752 डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 22.16 डॉलर आहेत. डॉलरचे मूल्य बळकट झाल्याने सोन्याच्या किमती वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपान पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-VIDEO : भर दिवसा सर्वांसमोर महिलांनी चक्क सोन्याच्या दुकानातून 1 कोटी 20 लाखांचे दागिने पळवले
गुरुपुष्यामृत योग असूनही जळगावातील सराफा बाजारात ग्राहकांचा निरुत्साह
30 ऑक्टोबरला गुरुपुष्यामृत योग होता. हा मुहूर्त सोने खरेदीसाठी शुभ मानला जातो. पण, सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात मात्र मंदीचे सावट होते. कोरोना व ओला दुष्काळ अशा कारणांमुळे ग्राहकांनी सोने खरेदीत आपला हात आखडता घेतल्या दिसून आले. एरवी गुरुपुष्यामृत योग साधून सोने खरेदीसाठी जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी असायची. पण, गुरुवारी अगदी उलट चित्र आहे. बोटावर मोजता येतील इतकेच ग्राहक सोने खरेदीला दिसले होते. त्यामुळे सराफ व्यवसायिकांच्या पदरी निराशा आली आहे.
हेही वाचा-जळगावच्या सराफ बाजारात गुरुपुष्यामृत योग असूनही मंदीच; ग्राहकांचा सोने खरेदीत हात आखडता