ETV Bharat / business

मालामाल.. अ‌ॅमेझॉनवर विक्रीतून अवघ्या 48 तासात 209 उद्योग झाले कोट्याधीश!

author img

By

Published : Aug 10, 2020, 5:25 PM IST

अ‌ॅमेझॉनने 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 'प्राईम डे' या सवलतीच्या योजनेची सुरुवात केली. त्यामध्ये श्रेणी-2 आणि श्रेणी-3 मधील शहरांतून 62 हजार विक्रेत्यांनी संपूर्ण देशातून विक्रीसाठी सहभाग घेतला. दोन दिवसांच्या सवलतीच्या योजनेत देशातील 91 हजार लघू आणि मध्यम उद्योगांनी सहभाग घेतला.

प्रतिकात्मक- अॅमेझॉन
प्रतिकात्मक- अॅमेझॉन

बंगळुरू – कोरोना महामारीत मंदीसदृश्य स्थिती असतानाही अ‌ॅमेझॉनने 'प्राईम डे'च्या ऑनलाईन विक्रीत धमाकेदार यश मिळविले आहे. या विक्रीत 209 लघू व मध्यम उद्योग हे 48 तासांत कोट्याधीश झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अ‌ॅमेझॉनने 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 'प्राईम डे' या सवलतीच्या योजनेची सुरुवात केली. त्यामध्ये श्रेणी-2 आणि श्रेणी-3 मधील शहरांतून 62 हजार विक्रेत्यांनी संपूर्ण देशातून विक्रीसाठी सहभाग घेतला. दोन दिवसांच्या सवलतीच्या योजनेत देशातील 91 हजार लघू आणि मध्यम उद्योगांनी सहभाग घेतला.

31 हजार लघू आणि मध्यम उद्योगांनी आजवरची सर्वाधिक विक्री केली आहे. तर 4 हजार लघू आणि मध्यम उद्योगांनी केवळ 48 तासामध्येच 10 लाख व त्याहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे.

सुमारे 1 लाख लघू आणि मध्यम उद्योगांना ऑर्डर -

अ‌ॅमेझॉन इंडियाचे भारतीय उपाध्यश्र अमित अग्रवाल म्हणाले, की 'प्राईम डे' हा लघू व मध्यम भागीदारांसाठी विक्रीसाठी खास उपलब्ध केला होता. त्यांच्याकडून कायम विक्री वाढविण्यासाठी अमेझॉनकडे पाहिले जाते. हा लघू उद्योगांसाठी सर्वात मोठा 'प्राईम डे' राहिला आहे. त्यामध्ये सुमारे 1 लाख लघू आणि मध्यम उद्योगांना ऑर्डर मिळाल्या आहेत. तसेच कारागीर, महिला आणि लाँचपॅड आंत्रेप्रेन्युअर यांनीही पहिल्या दिवशीपासून आजवरची सर्वात मोठी विक्री केली आहे.

अलेक्साने दिली 10 लाखांहून अधिक प्रश्नांची उत्तरे-

गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्राईमचे सदस्यत्व घेणाऱ्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. तर नवीन सदस्यांपैकी 65 टक्के सदस्य हे प्रमुख 10 महानगरांव्यतिरिक्त शहरामधील आहेत. प्राईम डेला ऑनलाईन सहायक अलेक्साने ग्राहकांच्या 10 लाखांहून अधिक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अलेक्साने ग्राहकांना उत्पादनांची खरेदी, चांगल्या डील, नवीन लाँचिंग आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन केले.

कंपनीने 11 ऑगस्टपर्यंत 'फ्रीडम डे' ही खरेदी सवलतीची योजना शुक्रवारी जाहीर केली आहे. यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप आदी वस्तुंच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी सवलत देण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.