मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सरकारने काढले आहेत.
वित्तीय सेवा विभागाने डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे शिफारस केली होती. या समितीने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. विश्वनाथन यांची नियुक्ती ४ जुलैपासून पुढे एक वर्ष असणार आहे. हे आदेश पर्सनल मिनिस्ट्रीने काढले आहेत.
विश्वनाथन यांचा बुधवारी कार्यकाळ संपणार होता. विश्वनाथन यांच्या व्यतिरिक्त बी.पी. कानूनगो आणि एम.के.जैन हे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
विरल आचार्य यांनी वैयक्तिक कारणामुळे डेप्युटी गव्हर्नपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ सहा महिन्यानंतर पूर्ण होणार होता. ते न्यूयॉर्क विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.