ETV Bharat / business

देशातील ४३ हजार ८८ गावे मोबाईल सेवेपासून दूर, रविशंकर प्रसाद यांची लोकसभेत माहिती

author img

By

Published : Jul 10, 2019, 4:03 PM IST

चालू आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील ५७ हजार ५५९ गावांमध्ये मोबाईल टॉवर बसविण्यात येणार आहेत. ही माहिती रवीशंकर प्रसाद यांनी लेखी उत्तरातून लोकसभेत दिली.

रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली - डिजीटल क्रांतीच्या देशाने झेपावणाऱ्या भारतात अजूनही हजारो गावांमध्ये मोबाईल सेवा पोहोचलेली नाही. देशातील ४३ हजार ८८ गावामध्ये मोबाईल सेवा नसल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत दिली.

चालू आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील ५७ हजार ५५९ गावांमध्ये दूरसंचार कंपन्यांकडून मोबाईल टॉवर बसविण्यात येणार आहेत. ही माहिती रवीशंकर प्रसाद यांनी लेखी उत्तरातून लोकसभेत दिली.
२०१८ पर्यंत ५.५४ लाख गावात मोबाईल सेवा पोहोचली आहे. मात्र ४३ हजार ८८ गावांपर्यंत ही सेवा पोहोचली नसल्याचे त्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

यामुळे गावापर्यंत पोहोचली नाही मोबाईल सेवा
मोबाईल सेवा पोहोचलेली गावे ही कमी लोकसंख्या असलेली दुर्गम आणि डोंगराळ भागात असल्याचे प्रसाद यांनी म्हटले आहे. तसेच मोबाईल ऑपरेटर कंपन्यांना व्यावसायिकदृष्ट्या तिथे सेवा देणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. भारत नेट योजनेतून २.५ लाख ग्रामपंचायती ब्रॉडब्रँडने जोडल्या जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

Intro:Body:

State news 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.