ETV Bharat / business

कोरोनाच्या संकटाने आयटीच्या पायाभूत सुविधांमध्ये होणार मोठा बदल - विप्रो अहवाल

author img

By

Published : Jun 15, 2020, 7:39 PM IST

डिजिटलमध्ये प्रभाव वाढविण्याकरता 81 टक्के उद्योग हे कार्यरत असलेल्या मनुष्यबळाचे पुनर्कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आयटीच्या पायाभूत क्षेत्रांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

wipro
विप्रो

बंगळुरू – कोरोना संकटाने आयटीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल होणार असल्याचे विप्रोच्या अहवालात म्हटलेे आहे. जगभरातील 75 टक्के संस्थांना नवीन साधने, तंत्रज्ञान आणि कोरोना महामारीत नेटवर्क चालविण्याकरता पायाभूत सुविधा वाढवाव्या लागणार आहेत. त्यासाठी संस्थांना बजेटही वाढवावे लागणार असल्याचे विप्रोच्या ‘आयटी पायाभूत सुविधांची 2020 मधील स्थिती’ अहवालात म्हटले आहे. हा अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

डिजिटलमध्ये प्रभाव वाढविण्याकरता 81 टक्के उद्योग हे कार्यरत असलेल्या मनुष्यबळाचे पुनर्कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आयटीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल होणार आहेत. कोरोना महामारीमुळे आयटीच्या पायाभूत सुविधांमध्ये नजीकच्या काळात काय बदल होणार आहे, याची विप्रोच्या अहवालात माहिती देण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणात कर्मचारी हे घरातून काम करत असल्याने उद्योग आणि पुरवठादारांसाठी आव्हान असणार आहे. आयटी पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणारे सुमारे 43 टक्के बजेट हे व्यवसायात परिवर्तन घडविण्यासाठी वापरण्यात येते. त्यामुळे नवसंशोधनासाठी मोठी संधी असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर 24 टक्के संस्थांकडे क्लाउडचे भागीदार नाहीत. त्यामुळे नव्या टप्प्यात संस्था क्लाउडसाठी मोठा खर्च करणार आहेत. कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेची उत्पादनेही वाढणार असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.