ETV Bharat / business

अमेरिका व्यापार करारात देणार नवा धक्का; 'हा' घेतला निर्णय

author img

By

Published : Jun 3, 2020, 7:26 PM IST

अमेरिकेचे वाणिज्य मंत्री रॉबर्ट लिथिझर म्हणाले, की आमच्या व्यापारी भागीदारांकडून डिजिटल कर स्वीकारण्यात येत आहे. त्याबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चिंतेत आहेत.

 file Photo
संग्रहित

वॉशिंग्टन - भारताबरोबर आयात शुल्काचा वाद झाल्यानंतर अमेरिका एका वेगळ्याच वादात पडण्याची शक्यता आहे. अमेरिकन सरकारने भारतासह विविध देशांनी सुरू केलेल्या डिजिटल सेवा कराचा तपास सुरू केला आहे. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री रॉबर्ट लिथिझर म्हणाले, की आमच्या व्यापारी भागीदारांकडून डिजिटल कर स्वीकारण्यात येत आहे. त्याबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चिंतेत आहेत.

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, युरोपियन युनियन, इंडोनेशिया, इटली, स्पेन, तुर्की आणि इंग्लंड या देशांमध्येही डिजिटल कर लागू करण्यात येत आहे. त्याबाबत अमेरीकन सरकार तपास करणार आहे. आमचे व्यवसाय आणि कामगारांच्या विरोधात कोणताही भेदभाव होत असेल तर त्या विरोधात योग्य कारवाई करण्यासाठी तयार असल्याचे लिथीझर म्हणाले.

गेल्या दोन वर्षात काही देशांनी डिजिटल कर लागू करण्याबाबत विचार सुरू केला आहे. तर काही देशांनी हा डिजिटल कर लागूही केला आहे. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री म्हणाले की की भारताने 2020 मध्ये डिजिटल सेवा कर लागू केला आहे. ऑनलाइन वस्तू विक्री करण्यावरही कर लागू करण्यात येत आहे.

दरम्यान, भारतात गुगल, फेसबुक व ॲमेझॉन या कंपन्यांचे मोठे आर्थिक व्यवहार होतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.