ETV Bharat / business

ठरलं! टेस्लाचे बंगळुरूमध्ये सुरू होणार कार्यालय - Tesla registration in India

टेस्लाने कंपनीच्या कार्यालयाची बंगळुरूमध्ये नोंदणी केली आहे. टेस्ला कंपनीच्या संचालक पदावर वैभव तनेजा, डेव्हिड जॉन फेनस्टिन आणि वेंकटरंगम श्रीराम यांची निवड करण्यात आली आहे.

टेस्ला
टेस्ला
author img

By

Published : Jan 13, 2021, 2:11 AM IST

बंगळुरू - टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी जाहीर केल्याप्रमाणे टेस्लाने अखेर भारतात प्रवेश केला आहे. टेस्लाकडून टेस्ला इंडिया मोटार्स आणि इनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची देशात नोंदणी झाली आहे.

टेस्लाने कंपनीच्या कार्यालयाची बंगळुरूमध्ये नोंदणी केली आहे. टेस्ला कंपनीच्या संचालक पदावर वैभव तनेजा, डेव्हिड जॉन फेनस्टिन आणि वेंकटरंगम श्रीराम यांची निवड करण्यात आली आहे. तर तनेजा हे चीफ अकाउटिंग ऑफिसर म्हणून कंपनीची धुरा सांभाळणार आहेत.

सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार कंपनीबरोबर सरकार चर्चा करत आहे. सरकारने कंपनीला जागेसह इतर पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्याबाबत कंपनीकडून निर्णय घेण्यात येणार आहे. इलॉन मस्क हे इलेक्ट्रिक सीडान लाँच करणार असल्याची चर्चा आहे. या इलेक्ट्रिक कारची भारतात सुमारे ६० लाख रुपये किंमत असणार आहे. महाराष्ट्र सरकारने पुण्यातील चाकण येथे टेस्लाला प्रकल्प सुरू करण्यासाठी यापूर्वीच आमंत्रित केले आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी टेस्लाच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे. टेस्लाकडून तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि गुजरातमध्ये संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्यासाठी विचार सुरू आहे.

हेही वाचा-इलॉन मस्क ठरले जगातील सर्वाधिक श्रीमंत; जेफ बेझोसला टाकले मागे

  • टेस्लाचे संस्थापक आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क हे वाहनांच्या विक्रीत फारशी समाधानकारक नसतानाही ते जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्समध्ये मागे टाकले आहे.
  • नुकतेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्ला कारच्या वितरणाची पूर्ण यंत्रणा २०२१ मध्ये भारतात असणार असल्याचे म्हटले होते. तसेच जगामधील सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादक देश होण्याची भारतामध्ये क्षमता आहे, असा विश्वास व्यक्त होता.

हेही वाचा-टेस्ला प्रकल्प सुरू करण्याकरता राज्य सरकारचे निमंत्रण; उद्योग मंत्र्यांची कंपनीबरोबर चर्चा

काय म्हटले होते मस्क यांनी?

इलॉन मस्क यांनी यापूर्वी भारतात इलेक्ट्रिक कार आणण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारच्या काही नियमांमुळे देशात कार आणण्यासाठी अडचणी असल्याचे मस्क यांनी २०१८मध्ये म्हटले होते. तसेच केंद्र सरकारच्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियमातील किचकट प्रक्रियेवरही त्यांनी टीका केली होती. चालू वर्षात टेस्लाच्या भारतीय चाहत्यांसाठी इलेक्ट्रिक मॉडेल लवकरच उपलब्ध करू, असा विश्वास व्यक्त केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.