नवी दिल्ली - स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोबाईलचा कॅमेरा जास्तीत जास्त पिक्सेलचा असावा, असे वाटते. त्यासाठी महागडे मोबाईल खरेदी करणाऱ्यांना रेडमीने माफक किमतीमधील मोबाईलचा पर्याय दिला आहे. रेडमीने नोट सेव्हन एस या मॉडेलमध्ये ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. या मोबाईलची किंमत 10 हजार ९९९ रुपये आहे.
एमआयच्या चाहत्यांना चांगली छायाचित्रे काढून आनंद व्यक्त करण्याची नव्या मॉडेलमुळे संधी मिळणार आहे. त्यासाठी अप्रतिम फीचर्स दिल्याचे शिओ इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी अनुज शर्मा यांनी सांगितले. रेडमी नोट ७ श्रेणीच्या २० लाख मोबाईलची देशात विक्री झाली आहे.
हे आहेत फीचर्स-
रेडमीचे क्वालकोम्न स्नॅपड्रॅगन ६६० हे प्रोससर आहे. त्याला ६.३ इंचची स्क्रीन आहे. हे मॉडेल २३ मेपासून ऑनलाईन उपलब्ध आहे. 3 जी+३२ जीबीचे मॉडेल हे १०,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तर ४ जीबी + ६४ जीबीचे मॉडेल हे १२,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. मोबाईलला असलेला पुढील कॅमेरा हा १३ मेगा पिक्सेलचा आहे. त्यासाठी एआय पोट्रेट मोडची सुविधा आहे. यातून रात्रीही स्थिर छायाचित्रे काढता येतात. त्यासाठी शिओमीच्या अॅपमधून तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.