ETV Bharat / business

बँकांनी व्याजदर कमी करूनही कर्ज घेण्याचे घटले प्रमाण-आरबीआय अहवाल - banking loans in corona crisis

कोरोनाच्या महामारीत देशात उद्योग व व्यवसायांवर परिणाम झाला आहे. असे असले तरी बँकांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक
भारतीय रिझर्व्ह बँक
author img

By

Published : Oct 10, 2020, 4:08 PM IST

मुंबई- कोरोनाच्या महामारीत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात आणि चलनाची तरलता वाढविण्याचे निर्णय घेतले आहेत. असे असले तरी एप्रिल ते सप्टेंबरमध्ये कर्जाचे प्रमाण कमी झाल्याची माहिती आरबीआयच्या अहवालामधून समोर आली आहे.

आरबीआयने ऑक्टोबर २०२० हा पतधोरण अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार महामारीमुळे पहिल्या सहामाहीत कर्ज घेण्याचे प्रमाण आणि कर्जाची मागणी कमी झाली आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक बँकांकडून वितरीत करण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण वाढले आहे.

वैयक्तिक आणि कृषीच्या कर्जाचे प्रमाण जुलै २०२० मध्ये वाढले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सेवा आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्जाचे प्रमाण कमी झाले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये वैयक्तिक कर्जाचे सर्वाधिक प्रमाण राहिले आहे. त्यानंतर सेवा क्षेत्रात सर्वाधिक कर्ज घेण्यात आली आहेत.

दरम्यान, कोरोना महामारीचा उद्योग व व्यवसायांवर परिणाम आहे. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने रेपो दरात कपात केल्याने बँकांचे कर्जाचे व्याजदर कमी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.