ETV Bharat / business

अझीम प्रेमजींचे सामाजिक कार्यासाठी ५२ हजार ७५० कोटींचे दान!

author img

By

Published : Mar 14, 2019, 7:57 PM IST

अझीम प्रेमजी यांनी अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या सामाजिक कार्यासाठी दान केले आहे. त्यांनी विप्रोतील ६७ टक्के हिस्सा हा सामाजिक कार्यासाठी दान केला आहे

अझीम प्रेमजी

बंगळुरू - विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजी यांनी विप्रोचे ३४ टक्के शेअर सामाजिक कार्यासाठी दान केले आहेत. या शेअरची एकूण किंमत ५२ हजार ७५० कोटी आहे. या दानामुळे अझीम प्रेमजी यांनी केलेले दान एकूण १ लाख ४५ हजार कोटी रुपये इतके झाले आहे.

अझीम प्रेमजी यांनी अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या सामाजिक कार्यासाठी दान केले आहे. त्यांनी विप्रोतील ६७ टक्के हिस्सा हा सामाजिक कार्यासाठी दान केला आहे. हे फाउंडेशन शैक्षणिक क्षेत्रात सरकारी शाळा सुधारणा करणे, बिगर सरकारी संस्थांच्या मदतीने प्रत्यक्ष ठिकाणी काम करणे असे उपक्रम करत आहे. हे काम कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगड, पदुच्चेरी, तेलंगणा, मध्यप्रदेशासह उत्तरपूर्वेकडील राज्यात सुरू आहे.

गेल्या ५ वर्षात १५० एनजीओंना फाउंडेशनकडून निधी मिळाला आहे. येत्या काही वर्षात फाउंडेशनचे काम आणखीन वाढणार आहे. सध्या फाउंडेशनमध्ये १ हजार ६०० लोक काम करीत आहेत. फाउंडेशनकडून बंगळुरुमध्ये अझीम प्रेमजी विद्यापीठ चालविले जात आहे. यामध्ये पदवी, पदव्युत्तर, महाविद्यालयीन अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. या विद्यापीठाचाही विस्तार करण्यात येणार आहे. हे विद्यापीठ विविध अभ्यासक्रमातून ५ हजार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार आहे. तर कोर्ससाठी ४०० शिक्षक असणार आहेत. तसेच उत्तरपूर्वेकडे दुसरे विद्यापीठ स्थापण्यात येणार आहे. याचा उद्देश हा देशात शाश्वत विकास, समानता आणणे असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.

Intro:Body:

Premji pledges 34% Wipro shares for philanthropy 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.