नवी दिल्ली - कोरोना महामारीत आयआरडीएआयने विमाधारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आरोग्य विमा कंपन्यांनी सध्याच्या आरोग्य विमा योजनेमध्ये बदल करू नये, असे आयआरडीएआयने निर्देश दिले आहेत. आरोग्य विम्यातील बदलामुळे विमाधारकांच्या विमा हप्त्यात वाढ होऊ नये, असेही आयआरडीएआयने निर्देशात म्हटले आहे.
आयरडीएआयने वैयक्तिक अपघात आणि प्रवास विमा योजनेतही बदल करू नये, असे विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) नियमांचे पालन करत विमा योजनेत किरकोळ बदल करण्याची परवानगी दिली आहे.
हेही वाचा-चांदीच्या दरात १०७३ तर सोन्याच्या दरात १०५ रुपयांची वाढ
अॅक्चुअरीने आर्थिक वर्षाखेर आरोग्य उत्पादनांचा आढावा घ्यावा, असे आयआरडीएआयने म्हटले आहे. हा अहवाल विमा कंपन्यांना आयआरडीएआयला सादर करावा लागणार आहे. चालू वर्षात १ ऑक्टोबरपासून विमा करारामध्ये नियबद्ध संरचनेचे अनुसरण करण्याचे विमा कंपन्यांना आयआरडीएआयने आदेश दिले आहेत.
हेही वाचा-टोलनाके काढून टाकण्यात येणार; जीपीएसवर आधारित टोल संकलन सुरू होणार