नवी दिल्ली - अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथिरिटी (एडीआयए) ही रिलायन्स रिटेलचा १.२ टक्के हिस्सा घेणार आहे. त्यासाठी ही कंपनी रिलायन्सला ५ हजार ५१२.५० कोटी रुपये देणार आहे. नुकतेच अबुधाबीची कंपनी मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीने रिलायन्समध्ये गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे.
रिलायन्स रिटेल विविध जागतिक कंपन्यांच्या गुंतवणुकीतून ३७ हजार ७१० कोटी रुपये संकलित करणार आहे. रिलायन्स रिटेलमध्ये जागतिक कंपन्यांनी गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये सिल्वर लेक, केकेआर, जनरल अटलांटिक, मुबादला, जीआयसी, टीपीजी आणि एडीआयए या कंपन्यांचा समावेश आहे.
हेही वाचा-सोने प्रति तोळा ४५४ रुपयाने महाग; चांदीच्या दरातही वाढ
- रिलायन्स रिटेलच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. सिंगापूरच्या सार्वभौम संपत्ती कंपनी जीआयसी ही रिलायन्स रिटेलचा १.२२ टक्के हिस्सा विकत घेणार आहे. त्यासाठी जीआयसी रिलायन्सला ५,५१२.५ कोटी रुपये देणार आहे.
- अबुधाबीची सार्वभौम संपत्ती निधी कंपनी मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी रिलायन्स रिटेलचा १.४ टक्के हिस्सा विकत घेणार आहे. त्यासाठी मुबादला कंपनी रिलायन्सला ६ हजार २४७.५ कोटी रुपये देणार आहे.
- जिओनंतर रिलायन्स रिटेलची गुंतवणुकीत घौडदौड सुरू झाली आहे. जनरल अटलांटिक कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल उद्योगाचा ०.८४ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. त्यासाठी जनरल अटलांटिक रिलायन्समध्ये ३ हजार ६७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
- रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सिल्व्हर लेक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लि. कंपनीत ७ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणार आहे. ही माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केली आहे.