ढाका - बांगलादेश क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यात युवा वेगवान गोलंदाज अबू जायेद हा नवा चेहरा आहे. २५ वर्षीय जायेदने मागील वर्षी कसोटीत पदार्पण केले आहे.
बांगलादेशच्या संघाकडून जायेदने ३ टी-२० सामनेदेखील खेळले आहेत. पण एकदिवसीय सामन्यात त्याला अजूनही खेळण्याची संधी मिळालेली नाही. मागील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटीत त्याने चांगली कामगिरी केली आहे.
बांगलादेशच्या संघात फलंदाज मुसद्दक हुसैन यांचीही निवड करण्यात आली आहे. तो त्याचा शेवटचा सामना आशिया चषक स्पर्धेत खेळला आहे.
विश्वकरंडकात बांगलादेशचा पहिला सामना २ जून रोजी केनिंग्टन ओव्हल येथे दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. त्यापूर्वी बांगलादेशचा पाकिस्तान आणि भारत यांच्यासोबत सराव सामना होणार आहे.
बांगलादेशचा संघ -
मशरफी मुर्तजा (कर्णधार), तामिम इकबाल, लिटन दास, महमूदुल्लाह रियाद, शाकिब अल हसन, मोहम्मद मिथुन, सौम्या सरकार, मुशफिकर रहीम, शब्बीर रहमान, मुसद्दक हुसैन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन, रूबेल हुसैन, मुस्ताफिजूर रहमान, अबू जायेद