गांधीनगर : शेतकरी नेते राकेश टिकैत दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. आज ते गुजरातच्या पालनपुर येथे शेतकऱ्यांना संबोधित करतील. याठिकाणी पोहोचताना शेतकरी त्यांचे स्वागत करत होते, मात्र एका तरुणाने त्यांच्या वाहनाला काळा झेंडा दाखवला. त्यानंतर शेतकऱ्यांनी या तरुणाला चांगलाच चोप दिला आहे.
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे देशभरात आंदोलन सुरू आहे. किसान संयुक्त मोर्चाचे प्रवक्ते आणि भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत सध्या देशभरात ठिकठिकाणी किसान महासभांचे आयोजन करत आहेत. देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये या कायद्यांविरोधात जनजागृती व्हावी यासाठी ते महापंचायती बोलावत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा : तृणमूलच्या कार्यालयासह कार्यकर्त्यांचीही तोडफोड; भाजपाच्या पाच जणांना अटक