ETV Bharat / bharat

Guru Nanak Jayanti 2022 : कधी असते गुरु नानक जयंती? प्रकाश पर्वचा इतिहास जाणून घ्या - गुरु नानक देव

शीख धर्माचे पहिले गुरु (Guru Nanak Jayanti 2022) मानले जाणारे गुरु नानक देव यांचा जन्म कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झाला. म्हणूनच हा दिवस प्रकाश पर्व (history of Prakash Parva) किंवा गुरु परब म्हणून साजरा केला जातो. गुरु नानक जयंतीची तारीख आणि इतिहास जाणून घ्या.

Guru Nanak Jayanti 2022
गुरु नानक जयंती
author img

By

Published : Nov 4, 2022, 5:34 PM IST

गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2022) हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा हा सण ८ नोव्हेंबर रोजी साजरा केला जात आहे. शीख धर्माच्या अनुयायांसाठी ही जयंती खूप खास आहे. या कारणास्तव याला 'गुरु परब' किंवा 'प्रकाश पर्व' (history of Prakash Parva) असेही म्हणतात. कारण याच दिवशी गुरु नानक देव यांचा जन्म झाला होता. 1469 साली कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यामुळेच या दिवशी देश-विदेशाच्या कानाकोपऱ्यात कीर्तनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुरु नानक जयंतीचा इतिहास आणि तारीख जाणून घ्या.

गुरु नानक जयंती 2022 : या वर्षी 8 नोव्हेंबर 2022 रोजी गुरु नानक जयंती साजरी केली जात आहे. या वर्षी गुरु नानक यांची ५५३ वी जयंती साजरी होत आहे. गुरु नानक जी नैतिकता, कठीण परिश्रम आणि सत्यतेचा संदेश देतात. हा दिवस मोठ्या श्रद्धेने आणि सामूहिक भावनेने आणि प्रयत्नाने, जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. गुरु नानक यांचे जीवन प्रेम, सत्य आणि शौर्याने भरलेले होते.

गुरु नानक जयंतीचा इतिहास : मिळालेल्या माहितीनुसार, गुरु नानक हे शीख धर्माचे पहिले गुरु असल्याचे मानले जाते. गुरु नानक देव यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी तलवंडी ननकाना साहिब येथे झाला. त्यामुळे त्यांना नानक या नावाने संबोधले जाते. गुरु नानक देव यांनी शीख समाजाचा पाया घातला असे मानले जाते, म्हणूनच त्यांना संस्थापक म्हणतात. शीख धर्मात दहा गुरु होते आणि गुरु नानक देवजी हे पहिले गुरु (शीख धर्माचे संस्थापक) होते. शीख परंपरेतील सर्व दहा गुरूंच्या कथा आनंददायक आणि उत्थानकारक आहेत - त्या त्यांच्या त्यागाचे प्रतिबिंब आहेत. चांगल्या, निष्पाप आणि नीतिमानांच्या रक्षणासाठी गुरुंनी सर्वस्वाचा त्याग केला होता. सोप्या शब्दात गुरूंनी लोकांना ज्ञान दिले.

गुरु नानकांचा संदेश : गुरु नानक देवजींनी भक्तीचे अमृत - भक्ति रस याविषयी सांगितले होते. गुरु नानक देवजी हे भक्तीयोगात पूर्णपणे मग्न असलेले भक्त होते, तर गुरु गोविंद सिंग हे कर्मयोगी होते. जेव्हा लोक सांसारिक व्यवहारात अडकतात तेव्हा गुरु नानक देवजींनी त्यांना अंतर्मुख होण्याची प्रेरणा दिली - हा त्यांचा संदेश होता. गुरू नानक देवजी म्हणाले होते की, 'परमेश्वराच्या नावाचा विसर पडेल एवढ्या सांसारिक व्यवहारात मग्न होऊ नका.'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.