ETV Bharat / bharat

Congress Manifesto In Karnataka : कर्नाटक काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दलाची पीएफआयशी तुलना, विहिंप आक्रमक भूमिका

author img

By

Published : May 2, 2023, 7:12 PM IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सध्या सर्वच पक्ष जोरदार टीका टिप्पणी करत आहेत. दरम्यान, काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रदर्शीत केला आहे. त्यामधील काही आश्वासनांवरून विहिंपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Congress Manifesto In Karnataka
Congress Manifesto In Karnataka

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेचा सध्या जोरदारपणे प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रकाशीत केला आहे. यामध्ये विश्व हिंदू परिषदेशी संलग्न संघटना बजरंग दलाची तुलना पीएफआयशी केली असल्याचा वाद सध्या सुरू आहे. तसेच, सत्तेत आल्यास दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याचे आश्वासन यामध्ये दिले आहे. मात्र, काँग्रेसच्या या आश्वासन आणि जाहीरनाम्यावरुन देशात नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी बजरंग दलाची पीएफआयशी तुलना केल्याचा आरोप केला आहे. तसेच, आरोप केला की काँग्रेस आणि पीएफआयची युती आहे. काँग्रेसने संसदेत सिमीसारख्या दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्यास विरोध केला होता अशी आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली आहे.

बजरंग दल शक्य तितक्या लोकशाही मार्गाने प्रत्युत्तर देईल : सोनिया गांधी चुकीच्या मार्गाने बजरंग दलाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून ते म्हणाले की, आम्ही हे सहन करणार नाही. बजरंग दल शक्य तितक्या लोकशाही मार्गाने प्रत्युत्तर देईल. सुरेंद्र जैन म्हणाले की, काँग्रेस पक्षाने कर्नाटक निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना ज्या पद्धतीने प्रखर देशभक्तीवादी संघटना बजरंग दलाची तुलना कुप्रसिद्ध, देशद्रोही, दहशतवादी आणि प्रतिबंधित संघटना पीएफआयशी केली आहे, ती दुर्दैवी आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.

त्यावेळी काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते : विहिंप नेत्याने सांगितले की, बजरंग दलाचा प्रत्येक कार्यकर्ता देश आणि समाजासाठी समर्पित आहे. तर, संपूर्ण जग पीएफआयच्या कार्याशी परिचित आहे. काँग्रेस सरकारे पीएफआयला पाठिंबा देत असल्याचा आरोप करत जैन म्हणाले की, काँग्रेस आणि पीएफआय यांची युती आहे. संसदेत सिमीसारख्या दहशतवादी संघटनांवरही बंदी घालण्यासाठी काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली आहे.

हेही वाचा : गुजरात उच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना दिलासा नाही! शिक्षेला स्थगिती मागणाऱ्या याचिकेवरील निकाल ठेवला राखून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.