ETV Bharat / bharat

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत कोरोना पॉझिटिव्ह!

author img

By

Published : Mar 22, 2021, 2:58 PM IST

त्यांनी सध्या स्वतःला आयसोलेट केले असून, ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. यासोबतच, त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी हिंदीमध्ये याबाबत ट्विट केले..

Uttarakhand CM Tirath Singh Rawat tests COVID-19 positive
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत कोरोना पॉझिटिव्ह!

देहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. सोमवारी त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, मात्र आपली प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी ट्विट करत स्पष्ट केले.

त्यांनी सध्या स्वतःला आयसोलेट केले असून, ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. यासोबतच, त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी हिंदीमध्ये याबाबत ट्विट केले.

दहा मार्चला तीरथ सिंह रावत यांची तडकाफडकी मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना पक्षाने विचार करून सामूहिकरित्या निर्णय घेत, पदावरून हटवले होते. पक्षाचे आमदार रावत यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त होते.

हेही वाचा : रिप्ड जीन्स प्रकरण : मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या विधानावर राज्यातील तरुणांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.