रामबन (जम्मू आणि काश्मीर) - जम्मू प्रांताच्या वरच्या भागात सोमवारी या हंगामातील पहिली हिमवृष्टी झाली. केंद्रशासित प्रदेशातील बर्याच भागात हलका पाऊस पडल्यानंतर तापमान काही अंशांनी खाली आले होते. हिमवृष्टीमुळे जमिनिवर बर्फाचे ढगांसारखे थर तयार झाले होते. त्यामुळे तेथील पर्यटकांना मोह आवरला नाही. त्यांनी या हिमवृष्टीचा मनमुराद आनंद लुटला.
...म्हणून जम्मू काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणत असतील
उंचच उंच झाडं, आणि डोंगरावर पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर तयार झाली होती. यामुळे काश्मीर खोऱ्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं आहे. त्यामुळेच कदाचीत जम्मू काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणत असतील. नुकत्याच झालेल्या हिमवृष्टीमुळे तर काश्मीरचं सौंदर्य अधिकच खुललं आहे. निसर्गाच्या सगळ्या वैशिष्ठ्यांनी नटलेल्या जम्मू काश्मीरमध्ये पर्यटक तिथल्या अदद्भूत सौंदर्याचा आनंद लुटत आहेत.
येथील नाथटॉप भागात बर्याच पर्यटकांनी हिमवृष्टीचा आनंद घेतला. हिमवृष्टीने नजर जाईल तिथपर्यंत फक्त बर्फ पहायला मिळत आहे. अहमदाबाद येथील पर्यटकांच्या काश्मीरमध्ये हिमवृष्टी पहायला मिळेल असे वाटत होते. मात्र त्या आधिच त्यांना जम्मूमध्ये बर्फवृष्टी अनुभवता आली.
पर्यटक रमेश तलावीया म्हणाले, "आम्ही कात्रा येथे आलो होतो आणि परत जाण्यापूर्वी काही दिवस जम्मूला जाण्याचा विचार केला होता. आम्ही बर्फ पाहण्यासाठी काश्मीरला जाण्याचा विचारही करत होतो. पण आम्हाला काश्मीरचा अनुभव जम्मूमध्येच मिळाला,"
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद-
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जवाहर बोगद्याच्या क्षेत्रात हिमवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद होता. तर पिरपंजाल पर्वतराजीच्या उच्च भागातही हिमवृष्टी झाल्याने मुघल रस्ता बंद करण्यात आला होता.
सोमवारी जम्मूमध्ये कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस होते, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले.
हेही वाचा- देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर
हेही वाचा- चारित्र्यहिन सदाभाऊंचे हातही अस्वच्छच; तडजोडीच्या मुद्यावरून राजू शेट्टींचे टीकास्त्र