ETV Bharat / bharat

'ट्रम्प प्रशासन देवाच्या कृपेने गेलं' इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केलं समाधान

author img

By

Published : Jan 21, 2021, 7:32 PM IST

जो बायडेन यांच्या शपथविधीच्या काही तासांनंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी समाधान व्यक्त केले. ट्रम्प प्रशासन देवाच्या कृपेने गेल्याचं त्यांनी म्हटलं.

हसन रुहानी
हसन रुहानी

तेहरान - अमेरिकेचे अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच अनेक देशांच्या प्रमुखांनी सुटेकचा श्वास घेतला आहे. जो बायडेन यांच्या शपथविधीच्या काही तासांनंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी समाधान व्यक्त केले. ट्रम्प प्रशासन देवाच्या कृपेने गेल्याचं त्यांनी म्हटलं. दक्षिण इराणमधील पर्शियन गल्फ बिड बोलँड गॅस रिफायनरी नावाच्या मध्य-पूर्वेतील सर्वात मोठी गॅस रिफायनरीच्या उद्घाटन सोहळ्यात हसन रूहानी यांनी हे वक्तव्य केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष असताना काही मुस्लीम देशातील मुस्लीम प्रवाशांना अमेरिकेत बंदी घातील होती. मात्र, पदभार हाती घेताच पहिल्या दिवशी जो बायडेन यांनी 'ट्रॅव्हल बॅन' उठवला आहे. अनेक मुस्लीम देश आणि आफ्रिकन देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास ट्रम्प यांनी निर्बंध घातले होते. इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सिरिया आणि येमन या मुस्लीम बहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली होती.

अमेरिकेत जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. नवनिर्वाचित अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन देशाचे 46वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ऐतिहासिक भाषण करताना जो बायडेन यांनी अमेरिकेसमोरच्या समस्या आणि आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीची रूपरेषा देशासमोर आणि जगासमोर मांडली. यावेळी बायडेन यांनी त्यांच्या सहकारी आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरिस यांचेही विशेष कौतुक केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.