ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या! - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globe
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : May 16, 2021, 7:08 AM IST

Updated : May 16, 2021, 1:03 PM IST

  1. पुणे - काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील मित्र परिवारांना दु:ख अनावर झाले आहे. सातव यांच्या निधनाचे वृत्त समजाताच त्यांच्या मित्रांनी जहांगीर रुग्णालय परिसरात गर्दी केली. यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयात सातव यांच्यासोबत शिक्षण घेतलेल्या मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सविस्तर वाचा..
  2. मुंबई - काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. राजीव सातव यांच्यासारख्या निष्कलंक नेत्यांच्या जाण्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा..
  3. मुंबई - काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज कोरोनामुळे पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुःख व्यक्त केले. सविस्तर वाचा..
  4. पुणे - काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. सातव हे गेल्या २३ एप्रिलपासून कोरोनाने संक्रमित होते. काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. सविस्तर वाचा..
  5. मुंबई : तौक्ते चक्रीवादळ हे सध्या कर्नाटकच्या किनारपट्टीवर असून; गोव्यापासून ते १७०, तर मुंबईपासून ५२० किलोमीटर दूर आहे. इथून गुजरातकडे जाण्यासाठी त्याला तीन दिवस लागतील. १८ मेच्या पहाटे ते गुजरातच्या पोरबंदर आणि महुआ किनाऱ्यावरुन पुढे जाईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वाचा लाईव्ह अपडेट्स..
  6. मुंबई - तौत्के चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर होत त्याचा प्रवास गुजरातच्या दिशेने सुरू आहे. पुढच्या काही तासांमध्ये हे चक्रीवादळ मुंबईच्या जवळून जाईल. वादळ जसजसे मुंबईच्या जवळ येईल तसे वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वांद्रे वरळी सी लिंक दळणवळणासाठी बंद करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र सर्व अधिकार हे वाहतूक नियंत्रण विभागाकडे देण्यात आलेले आहे. सविस्तर वाचा..
  7. मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्रात रुग्णांची आणि मृत्यूची संख्या लपवली जात आल्याचा आरोप राज्य सरकारवर केला होता. पण राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृतकांच्या संख्येबाबत लपवाछपवी केली नाही. तसेच भाजप शासित राज्यात आकड्यांची लपवाछपवी केली जात असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी ट्विटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. सविस्तर वाचा..
  8. पुणे : जिल्ह्यातील पुणे-सासवड रस्त्यावर वडकी गाव येथे शनिवारी मध्यरात्री एका तेलाच्या गोडाउनला भीषण आग लागली. याबाबत माहिती मिळताच पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. सविस्तर वाचा..
  9. मुंबई - अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तौक्ते चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा किनारपट्टी भागात जास्त असणार आहे. कारण या भागातूनही चक्रीवादळ जाणार असून, महाराष्ट्राला कुठे धडकणार नसल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. सविस्तर वाचा..
  10. मुंबई - अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे शनिवारी मध्यरात्री ढगांच्या गडगडाटासह मुंबई महानगर प्रदेशातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक कोसळलेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली. दिवा परिसरालाही पावसाचा फटका बसला. दरम्यान, रविवारीही शहर व उपनगरांत जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सविस्तर वाचा..

Last Updated : May 16, 2021, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.