ETV Bharat / bharat

एम.के. स्टॅलिन तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; दहा वर्षांनी आलीये द्रमुकची सत्ता

author img

By

Published : May 7, 2021, 10:12 AM IST

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टॅलिन यांना गुप्ततेची शपथ दिली. स्टॅलिन यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा अगदीच साधेपणाने पार पडला.

Stalin takes oath as Tamil Nadu CM along with 33 ministers
एम.के. स्टॅलिन तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; दहा वर्षांनी आलीये द्रमुकची सत्ता

चेन्नई : द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबतच द्रमुकच्या ३४ नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घतेली. यामध्ये १९ माजी मंत्र्यांचा समावेश आहे. तर १५ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टॅलिन यांना गुप्ततेची शपथ दिली. स्टॅलिन यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा अगदीच साधेपणाने पार पडला. या सोहळ्याला अण्णाद्रमुकचे प्रमुक ओ. पनीरसेल्वम, काँग्रेसचे पी. चिदंबरम, एमडीएमके प्रमुख वाईको आणि राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी गुरुवारी स्टॅलिन यांच्या मंत्रीमंडळास मान्यता दिली. विशेष म्हणजे, स्टॅलिन यांचे पुत्र आणि अभिनेता उदयनिधी स्टॅलिनचा मंत्रिमंडळात समावेश नाहीये. द्रमुक आघाडीने या निवडणुकीत १५७ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल दहा वर्षांनंतर राज्यात अण्णाद्रमुकऐवजी द्रमुकची सत्ता आली आहे.

स्टॅलिन यांचे मंत्रिमंडळ पुढीलप्रमाणे..

  • एम.के. स्टॅलिन - मुख्यमंत्री, गृहमंत्री
  • दुराईमुरुगन - जलसंपदा मंत्री
  • के.एन. नेहरू - मनपा प्रशासन मंत्री
  • आय. पेरियासामी - सहकार मंत्री
  • के. पोनमुडी - उच्च शिक्षण मंत्री
  • इ.व्ही. वेळू - सार्वजनिक बांधकाम मंत्री
  • एम.आर.के. पन्नेरसेल्वम - कृषीमंत्री
  • के.के.एस.एस.आर. रामचंद्रन - महसूल व आपत्ती व्यवस्थापन मंत्री
  • थांगम थन्नरसु - उद्योगमंत्री
  • एस. रघुपति - कायदा मंत्री
  • एस. मुथुसामी - गृहनिर्माण व नगरविकास मंत्री
  • के.आर. पेरियाकरप्पन - ग्रामीण विकास मंत्री
  • टी.एम. अंबरासन - ग्रामीण उद्योग मंत्री
  • एम.पी. समिनाथन - माहिती व प्रसिद्धी मंत्री
  • पी. गीता जीवन - समाज कल्याण व महिला सशक्तीकरण मंत्री
  • अनिता आर. राधाकृष्णन - मत्स्यव्यवसाय मंत्री
  • एस.आर. राजकण्णप्पन - परिवहन मंत्री
  • के. रामचंद्रन - वनमंत्री
  • आर. सक्रपाणी - अन्न व नागरी पुरवठा मंत्री
  • व्ही. सेन्थिलबालाजी - विद्युत, बंदी व उत्पादन शुल्क मंत्री
  • आर. गांधी - हातमाग आणि वस्त्रोद्योग मंत्री
  • मा. सुब्रमण्यम - वैद्यकीय आणि कुटुंब कल्याण मंत्री
  • पी. मूरथी - व्यावसायिक कर आणि नोंदणी मंत्री
  • एस.एस. शिवसणकर - मागासवर्गीय कल्याण मंत्री
  • पी.के. शेखर बाबू - हिंदू धार्मिक व धर्मादाय देणगीदार मंत्री
  • पलानीवेल थियागराजन - अर्थमंत्री
  • एस.एम. नासर - दूध व दुग्धविकास मंत्री
  • जिंजी के.एस. मस्तान - अल्पसंख्यांक कल्याण आणि अनिवासी तमिळ कल्याण मंत्री
  • अनबिल महेश पोयमोझी - शालेय शिक्षणमंत्री
  • शिवा. व्ही. म्यायानथन - पर्यावरण, युवा कल्याण व क्रीडा मंत्री
  • सी.व्ही. गणेशन - कामगार मंत्री
  • टी. मनो थांगराज - माहिती तंत्रज्ञान मंत्री
  • एम. मॅथिवेन्थन - पर्यटन मंत्री
  • एन. कायलविझी सेल्वराज - आदि द्रविड कल्याण मंत्री

हेही वाचा : तामिळनाडूमध्ये सत्तांतर! तब्बल दहा वर्षांनंतर उगवला 'द्रमुक'चा सूर्य!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.