ETV Bharat / bharat

Rape Accused Commits Suicide : बलात्काराच्या आरोपीने कुटुंबांला विष पाजून स्व:तालाही संपवले

बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या एक आरोपी तीन महिने तुरुंगात होता. बाहेर आल्या नंतर त्याने थेट गाव गाठले. आणि पत्नी तसेच मुलांची विष पाजून हत्या ( killing wife and children ) केली, आणि शेवटी गळफास घेऊन आत्महत्या केली. ( Rape Accused Commits Suicide After killing wife and children )

Rape Accused Commits Suicide
बलात्काराच्या आरोपीने आत्महत्या केली
author img

By

Published : Dec 8, 2022, 10:54 AM IST

बांसवाडा : जिल्ह्यातील उदयपुरा बडा ग्रामपंचायतीच्या पितापुरा गावात ही घटना समोर आली. ( killing wife and children ). या प्रकारामुळे त्याचे संपूर्ण कुटुंबच संपले आहे. गुजरातच्या न्यायालयात ४० वर्षीय मोहन डामोर यांच्यावर बलात्काराचा खटला सुरू होता. ज्यात त्याने 3 महिने तुरुंगातही घालवले. यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला आणि अखेर त्याने हे पाऊल उचलले. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. Rape Accused Commits Suicide After killing wife and children)

साडीने घेतला गळफास : आरोपी ४० वर्षीय मोहन डामोर याच्या घरात बुधवारी दुपारी चार मृतदेह सापडले. 36 वर्षीय शारदा डामोर, तिचा 14 वर्षीय मुलगा हरीश आणि 5 वर्षांचा मुलगा राहुल अशी त्यांची ओळख पटली. या सर्वांचे मृतदेह घराच्या आत कॉटवर पडलेले होते, तर मोहन डामोर हा साडीने फासाला लटकलेल्या अवस्थेत होता. सायंकाळी मोहनचे वडील नथू हे नातेवाईकांकडून परतले आणि मुलाच्या घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. एसपी राजेश कुमार मीना यांनी सांगितले की, मृतदेह २ दिवसपासून पडून असण्याची शक्यता आहे, सध्या पोलिस तपास करत आहेत.

बलात्काराचा आरोप : गावकऱ्यांनी सांगितले की, मोहन गुजरातच्या राजकोटमध्ये काबाडकष्ट करायचा. जिथे त्याने एका महिलेशी मैत्री केली. याच महिलेने मोहनवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो तीन महिने तुरुंगात होता. त्याला दोन दिवसांपूर्वी सोडण्यात आले होते.

पत्नी आणि मुलांना दिले विष : त्याने मुलाला आणि पत्नीला जेवणात विष दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे घर गावाच्या वस्तीपासून लांब होते. शेतात बांधलेल्या घरात ते कुटुंबासह राहत होते. त्यामुळे या घटनेची कोणालाच कल्पना नव्हती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.