नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 23 मे ला राज्य शिक्षा मंत्री आणि सचिवांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत बोर्ड परीक्षांवर चर्चा होणार आहे. कोरोना महामारीमुळे सीबीएसईसह राज्य बोर्डांनी 12 वीच्या परीक्षांना काही काळासाठी स्थगित केले आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
उद्या होणाऱ्या बैठकीची माहिती केंद्रीय शिक्षा मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी टि्वट करून दिली. राज्य सरकारच्या सर्व शिक्षण मंत्र्यांना आणि सचिवांना या बैठकीस उपस्थित राहून आगामी परीक्षांबाबत आपली मते सांगण्याची विनंती करण्यता आली आहे. ही बैठक 23 मे रोजी सकाळी 11.30 वाजता होईल, असे टि्वट निशंक यांनी केले आहे.
कोरोनाची एकूण संख्या -
कोरोनाची दुसरी लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. आज भारतात कोरोनाच्या 2,57,299 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2,62,89,290 एवढी आहे. देशात गेल्या २४ तासांत 4,194 नवीन मृत्यू झाले असून, आतापर्यंत मृतांची संख्या 2,95,525 वर गेली आहे. 3,57,630 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 2,30,70,365 नागरिकांना डिस्चार्ज मिळाला आहे. देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 29,23,400 आहे.