ETV Bharat / bharat

Raipur Dharma Sansad controversy : महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कालिचरण महाराजांविरोधात एफआयर दाखल - संत कालीचरण यांचे महात्मा गांधींबद्दल अपशब्द

संत कालीचरण यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत देशाच्या फाळणीसाठी बापूंनाही जबाबदार धरलं (Kalicharan On Mahatma Gandhi) यानंतर कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराजांचा शोध सुरू असल्याचे रायपूरचे एएसपी तारकेश्वर पटेल यांनी सांगितले.

कालीचरण
Raipur Dharma Sansad controversy
author img

By

Published : Dec 29, 2021, 12:20 PM IST

रायपूर - छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 26 डिसेंबर रोजी झालेल्या धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल ( Objectionable Remarks on Mahatma Gandhi ) अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी संत कालिचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल ( Case on Sant Kalicharan ) करण्यात आला आहे. कालीचरण महाराजांच्या धार्मिक कार्यक्रमानंतर टिकरापारा पोलीस ठाण्यात कलम 294 आणि 505 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराजांचा शोध सुरू असल्याचे रायपूरचे एएसपी तारकेश्वर पटेल यांनी सांगितले.

माहितीनुसार, कालीचरणच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या टीमचे नेतृत्व सीएसपी स्तरावरील अधिकारी करतात. यासोबतच 2 टीआय आणि अर्धा डझनहून अधिक जवानांचा समावेश करण्यात आला आहे. सीएसपी स्तरावरील अधिकाऱ्यासह ही टीम प्रथम महाराष्ट्रात रवाना झाली आहे. यासोबतच टीआयच्या नेतृत्वाखाली एक टीम दिल्लीच्या दिशेने रवाना झाली असून कालीचरण बाबाचा शोध सुरू आहे.

रविवारी राजधानी रायपूरमधील रावणभटा मैदानावर धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कालीचरण यांनी महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याला गोडसेला नतमस्तक करत महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले. यानंतर रायपूर महानगरपालिकेचे अध्यक्ष प्रमोद दुबे यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. एफआयआर नोंदवल्यानंतर आता कालीचरण महाराजांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. गांधींना शिव्या दिल्याचा कोणताही पश्चाताप नाही. मी गांधींचा द्वेष करतो. गांधींनी हिंदूंसाठी काय केले? , असे एफआयआरबाबत कालीचरण म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली. याप्रकारची येथे प्रक्षोभक आणि हिंसक विधाने सहन करण्यापलीकडचे आहेत, असे ते म्हणाले.

कालीचरण काय म्हणाले?

धर्मसंसदेत कालीचरण यांनी नथुराम गोडसेच्या फोटोला हात जोडून नमस्कार केला. त्यांनी जाहीरपणे म्हटले, की खासदार, आमदार, मंत्री आणि पंतप्रधान यांनी कट्टर हिंदुत्ववादी होण्याची गरज आहे. मतदान करणाऱ्या लोकांवरही त्यांनी यावेळी टीका केली. धर्मांतरण रोखण्यासाठी जातिव्यवस्था रद्द करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - University Reform Bill : सरकारला विद्यापीठांना आपले शासकीय महामंडळ बनवायचंय - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.