ETV Bharat / bharat

Narendra Modi Visit Rewa : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जाणार रिवा दौऱ्यावर, 7573 कोटींच्या योजनांची करणार पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशातील रिवा येथे भेट देणार आहेत. रिवा येथील विविध विकासकामांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

Narendra Modi Visit Rewa
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 24, 2023, 10:43 AM IST

रिवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रिवा येथे भेट देणार असून येथील एसएफ मैदानावर आयोजित पंचायत राज संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी यावेळी विविध विभागांच्या विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान विविध रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार असून रिवा ते नागपूर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जलजीवन मिशनच्या 7853 कोटी खर्चाच्या पाच मोठ्या नळ योजनांची पायाभरणी करणार आहेत.

नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार विविध कार्यक्रमाचे उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रिवा येथे खरीपासाठी तयार केलेल्या एकात्मिक ई ग्राम स्वराज आणि जीईएम पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात सर्वसमावेशक विकास या थीमवर अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत सर्वसमावेशक विकास वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅप लॉन्च करण्यात येईल. या कार्यक्रमाला आलेल्या लाखो नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. ग्रामीण विकास योजनांच्या यशावर प्रकाश टाकणारा धरती कहे पुकार के हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील 1 कोटी 25 लाख लाभार्थ्यांना मालकी हक्काचे कार्ड दिले जाणार आहेत. तसेच मध्य प्रदेशातील 4 लाख लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून बांधण्यात आलेल्या घरांमध्ये गृहप्रवेशाचा कार्यक्रमही यावेळी करण्यात येणार आहे.

आयुष्यमान भारत योजनेत महिलांना मिळणार विमा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 योजनांचे एकत्रीकरण करुन 5.5 कोटी महिलांना विमा कवच देण्याचे निश्चित केले आहे. आयुष्मान भारत योजनेतून ब्रेस्ट आणि सर्व्हायकल कर्करोगावर उपचार करण्याची योजना आखण्यात आली आहे. आहे. त्यामुळे देशातील 500 जिल्ह्यातील तब्बल 5.5 कोटी महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे.

जल जीवन मिशनच्या प्रकल्पाची पायाभरणी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जल जीवन मिशनच्या पाच मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी या कार्यक्रमात होणार आहे. या प्रकल्पांची एकूण किमत 7 हजार 853 कोटी 88 लाख रुपये आहे. हे प्रकल्पातून रेवा, सतना आणि सिंधी जिल्ह्यातील 4 हजार 36 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या गावातील 9 लाख 47 हजार 721 कुटुंबांना नळाचे शुद्ध पाणी मिळणार असून सुमारे 47 लाख 14 हजार नागरिकांना त्यांच्या घरात नळाद्वारे शुद्ध पाणी मिळणार आहे. या गावांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही अनोखी भेट असल्याचे म्हटले जात आहे.

अनेक दिग्गजांची राहणार हजेरी : राज्यपालांसह अनेक केंद्रीय मंत्री कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यात राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह, राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते, राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील आदींसह ग्रामीण विकास मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया, मंत्री बिशाहुलाल सिंह, राज्यमंत्री रामखेलावन पटेल, खासदार खजुराहो, विष्णू दत्त शर्मा, खासदार सतना गणेश सिंह, रिवाचे खासदार जनार्दन मिश्रा, खासदार सिद्धी रिती पाठक उपस्थित राहणार आहेत. यांच्यासह अनेक सरकारी अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा - Amit Shah on Muslim Resevation : ...तर मुस्लिम आरक्षण हटवणार; शाहांचे जाहीर सभेत वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.