नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमधील हिरोशिमाला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा दिवसाच्या या दौऱ्यात पापुआ न्यू गुनिया आणि ऑस्ट्रेलियाला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा दिवसाच्या दौऱ्यात शिखर परिषदांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यासह ते द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.
जी 20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांच्या या दौऱ्याविषयी माहिती दिली. यावेळी पंतप्रधान किशिदा यांच्या नुकत्याच झालेल्या भारत भेटीनंतर त्यांना पुन्हा भेटून आनंद होईल. या वर्षी G20 अध्यक्षपद भारताकडे असणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. जगासमोरील आव्हाने आणि त्यांना एकत्रितपणे संबोधित करण्याची गरज यावर मी G7 देश आणि इतर आमंत्रित भागीदारांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या काही नेत्यांसोबत पंतप्रधान मोदी द्विपक्षीय बैठकाही घेणार असल्याचेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जाणार 'या' देशात : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा दिवसाच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पापुआ न्यू गिनीतील पोर्ट मोरेस्बीला जाणार आहेत. पॅसिफिक बेट राष्ट्राची ही त्यांची पहिलीच भेट असणार आहे. कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने न्यू गिनीतील पोर्ट मोरेस्बी या देशाला दिलेली ही पहिलीच भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 मे रोजी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांच्यासमवेत संयुक्तपणे फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (PIC) च्या तिसऱ्या शिखर परिषदेचे आयोजन करणार आहेत.
शिखर परिषदेला उपस्थित राहणार 14 देश : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पॅसिफिक बेट देशांना पहिल्यांदा भेट देणार आहेत. त्यामुळे सर्व 14 पॅसिफिक बेट देशांनी या महत्त्वाच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारले. हे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल मी कृतज्ञ असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. PIC नेत्यांसोबत आम्हाला एकत्र आणणाऱ्या हवामान बदल आणि शाश्वत विकास, आरोग्य आणि कल्याण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास या मुद्द्यांवर बोलण्यासाठी उत्सुक असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले. पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल सर बॉब डाडे, पंतप्रधान मारापे आणि शिखर परिषदेत सहभागी होणार्या पीआयसीच्या काही नेत्यांशी द्विपक्षीय संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर : पापुआ न्यू गिनी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून ऑस्ट्रेलियातील सिडनीला जाणार आहेत. ते ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. मार्चमध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेचा पाठपुरावाही करणार आहेत. पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियन सीईओ आणि व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधणार आहेत. सिडनीमध्ये एका विशेष कार्यक्रमात भारतीय समुदायालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेटणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा -
- Assistant Professor Suicide Case : असिस्टंट प्रोफेसर आत्महत्या प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन, आत्महत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा
- Kota Online Fraud Case : मुंबईत बनावट फर्म करून शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक; पोलिसांनी पाच आरोपीच्या आवळल्या मुसक्या
- Mobile Phone Exploded In Pocket : खिशात मोबाईलचा स्फोट होऊन लागली आग; वेळीच आग विझविल्याने वाचले प्राण