ETV Bharat / bharat

Pakistan Issues Visas to 163 Pilgrims : गुरु अर्जन देव शहीद दिन कार्यक्रमाकरिता 163 शीख यात्रेकरूंना पाककडून व्हिसा

author img

By

Published : Jun 7, 2022, 5:09 PM IST

भारतातून मोठ्या संख्येने शीख यात्रेकरू विविध धार्मिक सण आणि प्रसंगी पाकिस्तानमधील गुरुद्वारांना भेट देतात. प्रभारी आफताब हसन खान यांनी या यात्रेकरूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या ( Aftab Hasan Khan  on Visa ) आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तानला पवित्र तीर्थस्थळे जतन करण्यात आणि भेट देणाऱ्या यात्रेकरूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात मोठा अभिमान वाटतो. यात्रेदरम्यान शीख यात्रेकरू पंजा साहिब ( Sikh pilgrims visit Panja Sahib ) , ननकाना साहिब आणि करतारपूर साहिबला भेट देतील.

Guru Arjan Dev Shahidi Day program
गुरु अर्जन देव शहीद दिन

इस्लामाबाद - नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तांनी ( Pakistan High Commission in New Delhi ) गुरु अर्जन देव शहीद दिन कार्यक्रमांतर्गत ( Guru Arjan Dev Shahidi Day program ) भारतातील १६३ शीख यात्रेकरूंना व्हिसा जारी केला आहे. हे यात्रेकरू 8 ते 17 जून दरम्यान पाकिस्तानमधील तीन शीख तीर्थक्षेत्रांना भेट देणार ( three Sikh pilgrimage sites in Pakistan ) आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनानुसार, पाकिस्तानी उच्चायुक्तालयाने हा व्हिसा 1974 च्या धार्मिक स्थळांच्या प्रवासाकरिता पाकिस्तान-भारत प्रोटोकॉल अंतर्गत ( Pakistan India Protocol on Travel ) जारी केला आहे.

दरवर्षी, भारतातून मोठ्या संख्येने शीख यात्रेकरू विविध धार्मिक सण आणि प्रसंगी पाकिस्तानमधील गुरुद्वारांना भेट देतात. प्रभारी आफताब हसन खान यांनी या यात्रेकरूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या ( Aftab Hasan Khan on Visa ) आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तानला पवित्र तीर्थस्थळे जतन करण्यात आणि भेट देणाऱ्या यात्रेकरूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात मोठा अभिमान वाटतो. यात्रेदरम्यान शीख यात्रेकरू पंजा साहिब ( Sikh pilgrims visit Panja Sahib ) , ननकाना साहिब आणि करतारपूर साहिबला भेट देतील. बुधवारी ते पाकिस्तानात दाखल होतील आणि १७ जूनला भारतात परततील.

गुरुद्वारा पंजा साहिब रावळपिंडीपासून 48 किमी अंतरावर-देशाच्या फाळणीनंतर, पहिले शीख गुरु नानक देव जी यांच्याशी संबंधित तीन प्रमुख तीर्थक्षेत्रे पाकिस्तानच्या हद्दीत गेली आहेत. त्यापैकी पंजा साहिब, ननकाना साहिब आणि करतारपूर साहिब प्रमुख आहेत. गुरुद्वारा पंजा साहिब रावळपिंडीपासून हे ४८ किमी अंतरावर आहे. पौराणिक कथेनुसार, प्रथम गुरु नानक देवजी येथे ध्यान करीत होते. तेव्हा कोणीतरी त्यांच्यावर मोठा दगड फेकला. दगड आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून गुरु नानक देवजींनी आपला पंजा वर केला. यानंतर दगड हवेत थांबला. आज त्याच ठिकाणी गुरुद्वारा पंजा साहिब आहे.

कर्तारपूर साहिब हे भारताच्या सीमेपासून 3 किलोमीटर अंतरावर- गुरुद्वारा ननकाना साहिब हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे. नानकाना साहिबला जाण्यासाठी लाहोरपासून 80 किमीचा प्रवास करावा लागतो. गुरू नानक देवजी यांचा जन्म 1469 मध्ये तलवंडी जिल्ह्यातील याच ठिकाणी झाला. त्यांनी प्रथमच येथे प्रचार केला. पुढे या ठिकाणाचे नाव नानकाना साहिब झाले. गुरु नानक देवजींशी संबंधित तिसरे स्थान कर्तारपूर साहिब आहे. हे भारताच्या गुरुदासपूर सीमेपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचा इतिहासही 500 वर्षांहून जुना आहे. गुरुद्वाराची स्थापना 1522 मध्ये शिखांचे गुरु नानक देव यांनी केली होती. गुरू नानक यांनी आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे येथे घालविली होती.

हेही वाचा-VIDEO: धक्कादायक.. तरुणाने रेल्वेच्या इंजिनखाली बसून केला अनेक किलोमीटरचा प्रवास.. रेल्वे थांबल्यावर..

हेही वाचा-काकीनाडा परिसरात वाघाचा धुमाकुळ; जेरबंद करण्यास वन विभागाला अपयश

हेही वाचा-Masked cancer drug : केमोथेरपी घेऊनही कर्करुग्णावर होणार नाहीत दुष्परिणाम, संशोधकांकडून मास्क तंत्रज्ञान विकसित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.