ETV Bharat / bharat

NASA Dart Mission : पृथ्वीला वाचवण्यात नासाच्या डार्ट मिशनला मोठं यश

author img

By

Published : Oct 12, 2022, 10:33 AM IST

अमेरिकेची अंतराळ संस्थेला नासाच्या (NASA) एका यानाला मोठे यश मिळाले आहे. त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट डार्ट मिशन यशस्वी ठरला आहे. पृथ्वीला वाचवण्याच्या उद्देशाने लघुग्रहावर धडकण्यासाठी निघालेल्या डार्ट मोहिमेला यश आले आहे. ही टक्कर तर झालीच पण यामुळे ऑर्बिटची दिशाही बदलली आहे.( NASAs spacecraft succeeds )

Nasache Antara
नासाचे अंतराळ

केप केनावेरल (अमेरिका) : अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) आणखी एक मोठे यश मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी नासाने, दुहेरी लघुग्रह पुनर्निर्देशन चाचणी (Double Asteroid Redirection Test - DART) मोहिमेचे अंतराळ यान डिडिमोस ( Didymos) लघुग्रहाभोवती फिरणाऱ्या (Dimorphos) या छोट्या लघुग्रहाशी धडकले. नासाने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, या टक्करमुळे हा लघुग्रह दुसऱ्या कक्षेत ढकलला गेला आहे.

मानवतेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण म्हणून ओळखला जाईल : जारी केलेल्या निवेदनात नासाने म्हटले आहे की, डार्टने लघुग्रहाचा मार्ग यशस्वीपणे बदलला आहे. आता तो दुसऱ्या कक्षेकडे निघाला आहे. हे नासाचे एक महत्त्वाकांक्षी मिशन होते. इतकंच नाहीतर मानवतेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण म्हणून ओळखला जाईल.

शास्त्रज्ञांसमोरील सर्वात मोठे आव्हान होते : DART मिशन (DART Mission) अंतराळ यानाची लांबी १९ मीटर होती. म्हणजे साधारण बसपेक्षा पाच मीटर जास्त. डिमॉर्फोस या लहान लघुग्रहाशी ज्या अंतराळ यानाची टक्कर झाली, तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट मोठा आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची लांबी ९३ मीटर आहे. तर डिमॉर्फोस १६३ मीटर आहे. म्हणजेच दीड फुटबॉल मैदानाच्या लांबीएवढी. डार्ट मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांसमोरील सर्वात मोठे आव्हान होते ते लाखो किलोमीटर अंतरावर असलेल्या डिमॉर्फोस या छोट्या लघुग्रहावरील अंतराळयानाला अचूकपणे टक्कर मारणे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, नासाने अंतराळ यानाच्या पुढील बाजूस DRACO कॅमेरा बसवला. त्यात स्वयंचलित नेव्हिगेशन प्रणाली SMART Nav होती. जी पृथ्वीवर बसलेल्या अभियंत्यांना दिशा आणि वेग बदलण्यात मदत करत होती.

अनेक दिवस दुर्बिणीद्वारे केले निरीक्षण : नासाने सांगितले की, त्यांनी पाठवलेले अंतराळ यान डिमॉर्फोस नावाच्या लघुग्रहाशी आढळले आणि त्यात एक विवर तयार झाला, ज्यामुळे त्यातून निघणारा मलबा अवकाशात पसरला आणि धूमकेतूप्रमाणे हजारो मैल लांब धूळ आणि ढिगाऱ्याची रेषा तयार झाली. एजन्सीने सांगितले की, वाहनाच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी, या 520 फूट लांबीच्या लघुग्रहाच्या मार्गात किती बदल झाला आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेक दिवस दुर्बिणीद्वारे निरीक्षण केले गेले.

शास्त्रज्ञांची अपेक्षा : वाहनाशी टक्कर होण्यापूर्वी या लघुग्रहाला मूळ लघुग्रहाभोवती फिरण्यासाठी 11 तास 55 मिनिटे लागायची. शास्त्रज्ञांची अपेक्षा आहे की त्यांनी ते 10 मिनिटांनी कमी केले आहे, परंतु नासाचे प्रशासन, बिल नेल्सन यांचा विश्वास आहे की, ही घटना 32 मिनिटांची आहे. विशेष म्हणजे, व्हेंडिंग मशीन-आकाराचे वाहन गेल्या वर्षी लॉन्च केले गेले आणि ते ताशी 22,500 किलोमीटर वेगाने सुमारे 11 दशलक्ष किलोमीटर दूर असलेल्या लघुग्रहावर आढळले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.