ETV Bharat / bharat

मुख्यमंत्री ममता बनर्जी प्रचारादरम्यान जखमी, षडयंत्र रचल्याचा आरोप

author img

By

Published : Mar 10, 2021, 7:58 PM IST

Updated : Mar 10, 2021, 8:04 PM IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत.

Mamata Banerjee injured while campaigning in Nandigram
मुख्यमंत्री ममता बनर्जी प्रचारादरम्यान जखमी, षडयंत्र रचल्याचा आरोप

नंदीग्राम (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. त्या आज नंदीग्राममध्ये प्रचार दौरा करत होत्या. यात प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांना दुखापत झाली. दरम्यान, ममता यांनी विरोधकांनी माझ्यावर हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षामध्ये सरळ लढत पाहायला मिळत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बंगालमध्ये प्रचाराचा धुराडा उडवला आहे. तर दुसरीकडे ममता यांनी देखील जोरात प्रचार दौरा सुरू केला आहे.

ममता बॅनर्जी आज नंदीग्राम येथे प्रचारासाठी आल्या होत्या. या प्रचारादरम्यान, त्यांना दुखापत झाली. ममता यांनी सांगितलं की, 'त्या जेव्हा आपल्या गाडीकडे निघाल्या होत्या. तेव्हा काही लोकांनी त्यांना धक्का देत खाली पाडलं.'

मुख्यमंत्री ममता बनर्जी प्रचारादरम्यान जखमी

दुखापत झाल्यानंतर ममता यांनी प्रचार दौरा रद्द करत उपचारासाठी कोलकाता गाठण्याचा निर्णय घेतला आहे.

तृणमूल काँग्रेसने या घटनेची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे सांगितलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी सहानभूती मिळवण्यासाठी ममता यांनी हा स्टंट केल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे आजच ममता यांनी नंदीग्राम विधानसभेच्या जागेसाठी आपला अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा - आयात होणाऱ्या कृषी उत्पादनावर अवलंबुन राहणे टाळण्याची हीच योग्य वेळ

हेही वाचा - पुरुषांना शॉर्ट्स तर मुलींना जीन्स घालण्यास 'खाप'ची बंदी

Last Updated : Mar 10, 2021, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.