पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळाचे आठ वर्षे पूर्ण (during the Modi government) केलेत. त्यांच्या 8 वर्षांच्या या कालावधीत भारत अनिर्णय आणि उदासिनतेच्या खाईतून बाहेर (what changes happened in the economy) आला आहे. आणि आता भारत परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्यास सज्ज झाला आहे, असे म्हणटल्यास वावगे ठरणार नाही. समाजाच्या सर्व क्षेत्रांत दिसून येणारा हा बदल आत्मनिर्भर भारताविषयी खूप काही सांगतो. PM Modi Birthday
सर्वांना समान लाभ : ‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास’ या वचनाने बांधलेला हा न्यू इंडिया आहे आणि याचा पाया मोदींनी घातला होता. या आठ वर्षांत वितरण प्रणालीत सुधारणा झाली. यामुळे प्रत्येकाला कोणताही पक्षपात न करता सरकारी योजनांचा लाभ समान मिळू लागला आहे.
कोरोनाचा समना यशस्वी : जेव्हा जगाला कोरोना महामारीचा फटका बसला. तेव्हा विकसित राष्ट्रांनाही असहाय्य वाटू लागले. तेव्हा पंतप्रधान मोदींनी 135 कोटी भारतीयांना निराशेतून आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी धोरणे आणली. मोफत राशन, मोफत लसीकरण आणि कोरोनाबाधित लोकांचे मोफत उपचार यामुळे, देशभरातील लोकांना अत्यंत आवश्यक दिलासा मिळाला आहे. मोदींनी वेळोवेळी केलेल्या अनेक घोषणांमुळे, भारताने केवळ आपल्या नागरिकांचे प्राणघातक कोरोनाव्हायरसपासून संरक्षण केले नाही तर; 20 लाख कोटी रुपयांच्या बूस्टर डोसद्वारे अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवनही केले. साथीच्या रोगाचा सामना करूनही, भारत अव्वल कामगिरी करणारी अर्थव्यवस्था राहिली हे जगाला दाखवुन दिले.
भारतीय संस्कृतीची जगाला ओळख : पंतप्रधानांनी विविध जागतिक मंचांचा उपयोग करून आपल्या महान संस्कृतीची समृद्धता आणि विविधता जगाला दाखवून दिली आहे. योग आणि आयुर्वेदाची जागतिक मान्यता हे या प्रयत्नांचे फलित आहे. 'सेवा, सुशासन आणि गरीबांचे कल्याण' करणारे सक्रिय सरकार हा मोदी सरकारचा आत्मा आहे. सुरुवातीपासूनच, पंतप्रधानांचे लक्ष सर्वसमावेशक विकासावर आहे. ज्यामध्ये समाजातील सर्व घटकांच्या गरजा आणि महत्वाकांक्षांची काळजी घेतली जाते.
आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता : केंद्र सरकारच्या आत्मनिभर भारत, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, स्टँड अप इंडिया आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजना भारताला स्वावलंबी बनवण्यात मैलाचे दगड आहेत. तर जेम पोर्टल, जन धन योजना, आधार, आणि डिजिटल स्मार्टफोनद्वारे होणाऱ्या व्यवहारांमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आली आहे.
अर्थव्यवस्थेचे डिजिटायझेशन : मोदी राजवटीचा सर्वात गाजलेला पैलू म्हणजे अर्थव्यवस्थेचे डिजिटायझेशन. त्याची सुरुवात आधारपासून झाली. यानंतर जन धन खाती आली आणि शेवटी कोट्यवधी भारतीयांसाठी स्वस्त इंटरनेट कनेक्शन वापरणे सुरु केले. जागतिक डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचा वाटा ४० टक्के आहे. जो जगामध्ये सर्वाधिक आहे. आज चहा विक्रेत्यांपासुन ते भाजी विक्रेत्यांकडेही क्यूआर कोड उपलब्ध आहेत, यात आश्चर्य नाही. काही वर्षांपूर्वी हे सगळे अकल्पनीय आहे, असे वाटत होते.
वंचित समाजालाही मिळाली घरे : सरकारी योजनांचा लाभ कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व राज्यांपर्यंत मोदींनी पोहोचला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, संपूर्ण भारतातील शहरी भागातील १.२२ कोटी कुटुंबांना आणि ग्रामीण भागातील २.५५ कोटी कुटुंबांना सरकारने घरे वाटप केली आहे. विशेष म्हणजे मुशार, बानटंगिया, थारू, सेहरिया यासारख्या अनेक वंचित समाजालाही घरे मिळाली.
योजनांमधुन मिळाला रोजगार : उत्तर प्रदेश देखील स्वच्छ भारत मिशनच्या सर्वात मोठ्या लाभार्थ्यांपैकी एक आहे. कारण या योजनेअंतर्गत देशभरातील 11 कोटींपैकी 2.61 कोटी कुटुंबांना शौचालये मिळाली आहेत. यूपीमध्ये 57,500 सामुदायिक शौचालये देखील बांधली गेली आहेत. या अंतर्गत, महिलांना या सामुदायिक शौचालयांच्या देखभालीसाठी 9,000 रुपये महीना भत्ता देणारा रोजगार देखील मिळाला आहे. PM Modi Birthday