ETV Bharat / bharat

Youtube New CEO Neal Mohan : अभिमानास्पद! भारतीय वंशाचे नील मोहन यांची यूट्यूबच्या सीईओ पदी निवड

author img

By

Published : Feb 17, 2023, 8:59 AM IST

भारतीय वंशाचे नील मोहन यांच्याकडे यूट्यूबची कमान देण्यात आली आहे. सुसान वोजिकी यांनी यूट्यूबच्या सीईओ पदावरून राजीनामा दिल्यानंतर नील मोहन यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे.

Neal Mohan
नील मोहन

न्यूयॉर्क : गेल्या नऊ वर्षांपासून यूट्यूब या जागतिक ऑनलाइन व्हिडिओ-शेअरिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नेतृत्व करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुसान वोजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला केला आहे. त्यांची जागा आता नील मोहन हे भारतीय-अमेरिकन व्यक्ती घेणार आहेत. वोजिकी (54) यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, 'ती कुटुंब, तिचे आरोग्य आणि वैयक्तिक जीवनावर लक्ष केंद्रित करणार आहे.

2014 पासून सीईओ : वोजिकी या गुगलच्या सुरुवातीच्या कर्मचाऱ्यांपैकी एक होत्या. 2014 मध्ये त्या यूट्यूबच्या सीईओ बनल्या. त्यांनी सांगितले की, यूट्यूबचे 'चीफ प्रोडक्ट ऑफिसर' नील मोहन हे यूट्यूबचे नवीन प्रमुख असतील. वोजिकी यांनी यूट्यूब कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिले की, 'आज मी यूट्यूबच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.' त्या म्हणाल्या, 'माझ्यासाठी हे करण्याची हीच योग्य वेळ आहे कारण आमच्याकडे एक जबरदस्त टीम आहे. जेव्हा मी नऊ वर्षांपूर्वी यूट्यूबमध्ये सामील झाले, तेव्हा एक उत्तम नेतृत्वक्षमता असणारी टीम तयार करणे हे माझे प्राधान्य होते. नील मोहन हे त्या लोकांपैकी एक आहेत. ते आता एसव्हीपी आणि युट्युबचे नवीन प्रमुख असतील.

भारतीय वंशाच्या सीईओंचे वर्चस्व : मोहन 2007 मध्ये 'डबलक्लिक' च्या अधिग्रहणानंतर गुगलमध्ये सामील झाले होते. 2015 मध्ये ते यूट्यूबचे 'चीफ प्रोडक्ट ऑफिसर' बनले. मोहन स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर आहेत. आता ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला, अ‍ॅडोबचे सीईओ शंतनू नारायण आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह यूएस-स्थित भारतीय वंशाच्या प्रमुख सीईओंच्या यादीत सामील होतील. भारतीय वंशाच्या इंद्रा नूयी यांनी 2018 मध्ये पायउतार होण्यापूर्वी 12 वर्षे पेप्सिकोच्या सीईओ म्हणून काम केले आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्या जाणार : फेब्रुवारी महिन्यात तंत्रज्ञान उद्योगातील सुमारे 17 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. 2023 मध्ये आतापर्यंत जगभरातील 340 कंपन्यांनी 1.10 लाखांहून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगल, अ‍ॅमेझॉन, ट्विटर, डेल, याहू अशा तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांनी नोकर कपातीची घोषणा केली आहे. मंदीच्या भीतीने येत्या काही दिवसांत नोकऱ्यांमध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक तंत्रज्ञान कामगारांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

हेही वाचा : Layoffs News 2023 : टेक आणि बायोटेक कंपन्यांनी दिली टाळेबंदीची सुचना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.