नवी दिल्ली - देशातील नव्या कोरोना रुग्णांचे दैनंदिन प्रमाण आता एक लाखाच्या खाली आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ही अद्यापही वाढत असल्याचे दिसत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. देशात गेल्या 24 तासांत नवे 48,786 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1,005 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 61,588 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 लाख इतकी आहे. देशाचा रिकव्हरी रेट 96.97 टक्क्यांवर आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...
- एकूण रुग्ण : 3,04,11,634
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,94,88,918
- सक्रिय रुग्ण संख्या : 5,23,257
- एकूण मृत्यू : 3,99,459
- एकूण लसीकरण : 33,57,16,019
कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या सुमारे 4 लाखांच्या जवळ पोहचली आहे. तर देशातील रिकव्हरी रेट 96.97 वर पोहचला आहे. तर मृत्यू दर हा 1.31 आणि सक्रिय रुग्णांचा दर 1.72 टक्के आहे. तर गेल्या 24 तासांत 27,60,345 हजार जणांना लस टोचवण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 33,57,16,019 जणांचे लसीकरण झाले आहे.
स्पूटनिक लाईटच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीला नकार -
रशियाची स्पूटनिक लाईट लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्यास डॉ. रेड्डी यांना भारतीय औषध नियामक मंडळाने परवानगी नाकारली आहे. स्पूटनिक लाईट ही रशियन-निर्मित स्पूटनिक व्ही लसीचा एक डोस आहे. स्पूटनिक लाइट ही स्पूटनिक व्हीच्या दोन डोसपैकी पहिल्या डोससारखे आहे. वैज्ञानिक प्रोटोकॉलच्या दृष्टिकोनातून स्पूटनिक लाईट लसीची सुरक्षा आणि कार्यक्षमता तपासली जात आहे. स्पूटनिक लाइट लसीचा एक डोस कोरोनाव्हायरस विरोधात 80 टक्के कार्यक्षम असल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोरोनाविरोधात स्पुटनिक व्ही जगातली पहिली रजिस्टर्ड होणारी लस होती.
हेही वाचा - #MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..