ETV Bharat / bharat

UK Election Result 2022 : वडिलांचा झाला होता पराभव, त्याच मतदारसंघातून मुलींनी मारली बाजी

उत्तराखंड निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासोबत हरीश राव यांचे मुख्यमंत्री बनन्याचे स्वप्नही भंग झाले. पण, हरीश रावत यांची मुलगी हरिद्वार ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला. तसेच माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते भुवन चंद्र खंडूडी यांची मुलगी ऋतु खंडूडी यांनी यंदा ज्या मतदारसंघातून वडील पराभूत झाले होते, त्याच मतदार संघातून विजय मिळवला आहे.

अनुपमा रावत
अनुपमा रावत
author img

By

Published : Mar 10, 2022, 10:15 PM IST

देहराडून ( उत्तराखंड ) - 'मुख्यमंत्री होणार नाही तर घरी बसणार', अशी घोषणा उत्तराखंडचे माजी मंत्री हरीश रावत यांनी केली होती. त्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणेच निकाल समोर आले आहे. राज्यात ना काँग्रेसची सत्ता स्थापन झाली ना हरीश रावत यांचा विजय झाला. या निवडणुकीत त्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली होती. या पराभवानंतर त्यांच्या राजकीय अस्तित्वावरही शंका उपस्थित केली जात आहे. पण, त्यांची मुलगी अनुपमा रावत हरिद्वार ग्रामीणमधून विजयी पताका फडकवल्याने हरीश रावत यांना थोड्या प्रमाणात का होईना समाधान मिळाले असेल. अनुपमा यांनी ज्या मतदार संघातून निवडणूक लढवली त्याच मतदार संघातून 2017 साली हरीश रावत यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मुलीने आपल्या पित्याच्या पराभवाचा बदला घेतला, अशी चर्चाही राज्यभर सुरू आहे.

लालकुआं मतदार संघातून पराभूत झाले हरीश रावत - 2022 च्या निवडणुकीत हरीश रावत काँग्रेसच्या चिन्हावर लालकुआ मतदार संघातून मैदानात उतरले होते. पण, भाजपचे उमेदवार मोहन सिंह बिष्ट यांनी तब्बल 13 हजार 893 मतांनी हरीश रावत यांना चितपट केले.

2017 मध्ये दोन जागांवरुन लढवली होती निवडणूक - 2017 साली हरीश रावत यांनी हरिद्वार ग्रामीण व किच्छा या दोन मतदार संघातून निवडणूक लढवली होती. पण, स्वामी यतीश्वरानंद व राजेश शुक्ला यांच्या समोर रावत यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. यावेळी हरदा हे भाजपचा विजयरथ थांबवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. पण, काँग्रेसचे 'सेनापती' हरदा यांना यावेळीही पराभवाचा सामना करावा लागला.

हरीश रावत यांची राजकीय कारकीर्द ( काँग्रेस ) (Harish Rawat’s Political Career) - हरीश रावत यांच्या राजकारणाची सुरुवात ग्रामपंचायतीपासून झाली. त्यानंतर व्यापारी संघटनेचे व युवक काँग्रेचे सदस्य म्हणून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू ठेवला. 1980 साली त्यांनी अल्मोडा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे बलाढ्य नेते मुरली मनोहर जोशी यांना धूळ चारली होती. त्यानंतर 1984 साली ते मुरली मनोहर जोशी यांचा मोठ्या फरकाने पुन्हा पराभव केला. 1989 साली लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वतंत्र उत्तराखंडसाठीच्या आंदोलनाने रौद्ररुप घेतले होते. दरम्यान, 1989 साली उत्तराखंड क्रांती दल (UKD)चे नेते काशी सिंह ऐरी यांचा पराभव करत सलग तिसऱ्यांना खासदारकी जिंकली होती. पण, ती कमी फरकाने जिंकली. त्यानंतर 1991, 1996, 1998 व 1999 असे सलग चारवेळा त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना हरिद्वार मतदारसंघातून तिकीट दिले. त्यावेळी त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर 2009 ते 2012 पर्यंत ते यूपीए सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री होते. 2012 ते 2014 या काळात केंद्रीय कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर फेब्रुवारी, 2014 साली त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व 2017 पर्यंत मुख्यमंत्री पदावर राहीले. दरम्यान, जुलै, 2014 मध्ये उत्तराखंडच्या धारचुला येथून पोटनिवडणुकीत ते जिंकून आले. 2017 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्यावेळी हरीश रावत यांनी हरिद्वार ग्रामीण व किच्छा या दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवली. पण, दोन्ही जागांवरून त्यांचा पराभव झाला. मुख्यमंत्री असतानाही दोन्ही मतदार संघातून पराभव झाल्याने काँग्रेस पक्षाला मोठा झटका लागला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते नैनीताल-उधमसिंह नगर मतदारसंघातून रिंगणात उतरले. मात्र, त्यांचा पुन्हा पराभव झाला.

गुटबाजीमुळे काँग्रेसला फटका - 2017 च्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये गुटबाजी सुरू झाली. हरदा, इंदिरा व प्रीतम खेमो, असे तीन गट काँग्रेस पक्षात निर्माण झाले. याचा फायदा भाजपला झाला. रावत यांच्या मंत्रीपदाच्या दाव्यानंतर काँग्रेसमध्ये गटबाजीला उत आले. याचा फटका केवळ हरीश रावतच नाही तर संपूर्ण काँग्रेस पक्षाला बसला. 70 जागा असलेल्या विधानसभेत काँग्रेसला केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या गटाबाजीमुळे एकमेकांची जिरवण्याच्या नादात काँग्रेसच्या नेत्याने पक्षाचीच जिरवली.

भुवन चंद्र खंडूडी - भूवन चंद्र खंडूडी हे मुख्यमंत्री असताना 2012 साली कोटद्वार मतदार संघातून पराभूत झाले होते. त्यांचा पराभव काँग्रेच्या सुरेंद्र सिंह नेगी यांनी केला होता. त्यांची मुलगी ऋतु खंडुडी या 2017 साली यमकेश्वर मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्या. मात्र, त्यांच्या मना कोटद्वार मतदार संघाबाबतची सल कायम होती. त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांच्या पराभवाचा हिशोब चुकता करण्यासाठी यंदा कोटद्वारमधून निवडणूक लढवण्याच ठरवले. सुरेंद्र सिंह नेगी यांचा पराभव करत त्यांनी वडील भुवन चंद्र खंडूडी यांचा हिशोब चुकता केला. आता भुवन चंद्र खंडुडी यांनी राजकीय संन्यास घेतला आहे.

ऋतु खंडूडी
ऋतु खंडूडी
राज्यातील 2017 ची स्थिती
पक्षविजयी उमेदवार
भाजप57
काँग्रेस11
अपक्ष2
एकूण70

हेही वाचा - Uttarakhand Election Result 2022 : दुसऱ्यांदा सत्ता स्थापन भाजपने रचला इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.