ETV Bharat / bharat

IIMC Will Shift To Nagpur : 'IIMC' अमरावतीतून नागपूरला हलवणार? गडकरींचे अनुराग ठाकूर यांना पत्र

author img

By

Published : Feb 23, 2022, 8:56 AM IST

Updated : Feb 23, 2022, 9:41 AM IST

अमरावती येथील आयआयएमसी नागपूरला स्थलांतरीत करावे या संदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र दिले आहे. (shift IIMC to Nagpur) आयआयएमसी अकरा वर्षांपासून अमरावतीत सुरू आहे.

अमरावतीतून नागपूरला हलवणार? गडकरींचे अनुराग ठाकूर यांना पत्र

अमरावती - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन ( Indian Institude of Mass Communication ) हे वारंवार वादात सापडले आहे. आयआयएमसीचे अमरावती येथील संचालक अनिलकुमार सौमित्र यांच्याविरोधात प्राध्यापकाचा वारंवार अपमान आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी अमरावती येथील पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. (Anil Saumitra under the Atrocities Act) दरम्यान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन ( IIMC ) अमरावती वरून आता नागपूरला हलवण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.

IIMC अमरावतीतून नागपूरला हलवणार?

आयआयएमसी अमरावती येथे विनय सोनुले हे 2019 पासून सहायक कंत्राटी प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे. अनिलकुमार सौमित्र यांनी संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून सोनुले यांना सर्वांसमोर अपमानित करणे, मानसिक त्रास देणे, संस्थेतील अधिकार काढुण घेणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे प्राध्यापक विनय सोनूले यांनी अनिलकुमार सौमित्र यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अनिलकुमार सौमित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे (IIMC Will Shift To Nagpur ) गत चार दिवसंपासूम हे केंद्र बंदच आहे. तसेच, आयआयएमसीचे अमरावती केंद्र 11 वर्षांपासून दुर्लक्षित आहे. त्याचे स्वतःचे कॅम्पस नाही, पुरेसे विद्यार्थी नाहीत आणि तज्ञ शिक्षक नाहीत असेही बोलले जात आहे.

प्रा. अनिलकुमार सौमित्र आहेत वादग्रस्त

प्रा. सौमित्र यांनी महात्मा गांधी यांचा 'फादर ऑफ पाकिस्तान' असा उल्लेख केलेला असल्याने पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ते कुठली शिकवण देणार? असा प्रश्नच उपस्थित करत युवक काँग्रेस आणि एनएसयुआयने प्रा. सौमित्र यांच्या अमरावती येथील नियुक्तीला विरोध करीत जानेवारी महिन्यात आंदोलनही केले होते. मात्र या आंदोलनाचा कुठलाही परिणाम झाला नव्हता. ऑक्टोंबर 2020 मध्ये सौमित्र यांची नियुक्ती अमरावतीत झाली. यापूर्वी ते मध्ये प्रदेशमध्ये भाजपाचे प्रवक्ते होते. फेसबुकवर महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर त्यांना भाजपातून निलंबित करण्यात आले. 2013 मध्ये भाजपाचे मुखपत्र चरैवेतीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

अनुराग ठाकूर यांना गडकरींचे पत्र

अमरावती येथील आयआयएमसी नागपूरला स्थलांतरीत करावे यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र ( Gadkari has given a letter to Anurag Thakur ) दिले आहे. अकरा वर्षांपासून अमरावतीत सुरू असणारे आयआएमसीचे केंद्र 2011 पासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरातच असून या केंद्रासाठी अमरावती शहरात अंजनगाव बोरी मार्गावर जागा मिळाली असतानाही केंद्र अमरावती विद्यापीठातून हलविण्याचे कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. नागपुरमध्ये स्वतःच्या हक्काची जागा या केंद्राला उपलब्ध आहे. अमरावतीचे हे केंद्र नागपूरला हलवले तर ते विकसित होईल असेही नितीन गडकरी यांनी केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

काय आहे आयआयएमसी?

आयआयटी, आयआयएमच्या धर्तीवर देशात पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन्स या संस्थेची स्थापना करण्यात आली. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या अखत्यारितील ही संस्था स्वायत्त आहे. दिल्लीव्यतिरिक्त महाराष्ट्रातील अमरावती, केरळ, जम्मू, ओरिसा आणि ऐजवाल येथे तिच्या शाखा आहेत. अमरावती येथील केंद्रात 2011 पासून इंग्रजी तर 2017 पासून मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमही सुरू झाला आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही शाखेसाठी प्रत्येकी 17- 17 जागा आहेत. मात्र, यावर्षी मराठी विभागात 16 आणि इंग्रजी विभागात 13 जागा भरण्यात आल्या आहेत. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रयत्नाने हे केंद्र अमरावतीत स्थापन झाले.

हेही वाचा - बाबासाहेबांची भूमिका साकारणे आव्हानात्मक; अभिनेता रोहित रॉय यांच्याशी खास बातचीत

Last Updated : Feb 23, 2022, 9:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.