आज दिवसभरात/आजपासून -
- मुंबईत आज लसीकरण सुरू राहणार आहे. पालिकेला 1.50 लाख कोविशिल्ड आणि 10,240 कोवॅक्सिन लसीचे डोस मिळाले आहेत.
- भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांचा औरंगाबाद दौरा होणार आहे. दुपारी 2.00 वाजता वेरुळ येथे श्री घृष्णेश्वर ज्योतीर्लिंग दर्शन यात्रेचे स्वागत व सत्कार समारंभ होणार आहे. सायंकाळी 5 वाजता यात्रा देवगावं, बोरगाव, टापरगाव, हतनूर, बनशेंद्रा, मक्रणपूर येथे जाऊन कन्नड मार्केट कमेटी मोंढा येथे होणार आहे.
- पुण्यात आज महापालिकेच्या १९५ केंद्रांवर कोरोना लसीकरण !
- औरंगाबाद महापालिकेच्या माध्यमातून आज शहरातील ५३ केंद्रांवर कोव्हिशिल्ड लसीचा डोस दिला जाणार आहेत.
- आज अहमदनगरमध्येही 8 आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे.
- नाशिकमध्येही लसीकरण सुरू राहणार आहे.
- चंद्रपूर - लसींचा पुरवठा न झाल्याने आज मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार. लस उपलब्ध होताच सुरू असणाऱ्या केंद्राची माहिती देण्यात येईल.
- काँग्रेस नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज बुलडाणा, अकोल्याचा दौरा करणार आहेत.
- रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते वीर येथील दुपदरीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे काही स्थानकांवरील रुळ जोडण्यांच्या कामांसाठी 21 ते 30 ऑगस्ट या कालावधीत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांना त्या-त्या स्थानकांवर विशिष्ठ कालावधीसाठी थांबा देण्यात येणार आहे.
- भंडारा - भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने फिट इंडिया फ्रिडम रनचे आयोजन आज सकाळी 7.30 वाजता करण्यात आले आहे.
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची वसई-विरारमध्ये जन आशीर्वाद यात्रा असणार आहे.
- पेडणे येथील ३३ केव्ही फिडरवरून होणारा वीजपुरवठा आज सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंत बंद असेल. या कालावधीत संपूर्ण पेडणे तालुक्यातील वीजपुरवठा खंडित असेल.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
- ठाणे - ठाण्यातील कार चालक घनश्याम पाठकच्या हत्येप्रकरणी 9 वर्षांनी न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आकाश साळुंखे, सचिन, सुभाष निचटे, काळुराम फर्डे अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. वाचा सविस्तर...
- सिंधुदुर्ग - 'आज जे शिवसेनेला तालिबानी म्हणत आहेत, पण मुंबईत 1991 साली शिवसेना नसती तर... त्याच हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेने मुंबई वाचवली होती. हिंदू लोकांना वाचविले होते. आजही मुंबईच्या जनतेला माहिती आहे की शिवसेना नसेल तर मात्र मुंबईत हिंदुंचे, मराठी माणसांचे काही खरं नाही. त्यामुळे भाजपने शिवसेनेला तालिबानी संस्कृती म्हटले तरी जनता ही शिवसेनेच्या पाठीशी राहील', असे जोरदार प्रत्युत्तर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे. तर 'गर्विष्ठ नारायण राणेंनाही शिवसेना प्रमुखांसमोर झुकावे लागले' असेही ते म्हणाले. वाचा सविस्तर...
- नांदेड - छत्तीसगड येथे झालेल्या माओवादी नांदेड जिल्ह्यातील एक जवान शहीद झाले आहेत. मुखेड तालुक्यातील बामणी येथील सुधाकर शिंदे असं या जवानाचे नाव आहे. सुधाकर शिंदे हे इंडो तिबेटीयन बटालियनचे सहायक सेनानी होते. शुक्रवारी दुपारी दरम्यान नारायणपूर येथे माओवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला होता. या दुःखद घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. वाचा सविस्तर...
- मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. आज शुक्रवारी (दि. २० ऑगस्ट) ४ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०५ मृत्यूंची नोंद झाली असून ६ हजार ३८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९७ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. वाचा सविस्तर...
- जालना - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. ते भाजपने सुरू कलेल्या जन आशीर्वाद यात्रेत जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे जाहीर सभेत बोलत होते. 'गावात देवाला सोडलेला जो सांड असतो, जो कुणाच्याही शेतात जाऊन चरतो आणि कुठेही फिरतो' तसे राहुल गांधी आहेत, असे वक्तव्य दानवे यांनी यावेळी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना राहुल गांधी यांच्यावर दानवे यांनी ही टीका केली आहे. पाहा व्हिडिओ
- चंद्रपूर - चिमूर कान्पा मार्गावरील मालेवाडा येथील सुगतकुटी जवळील झुडपी जंगलात वाघ असल्याचे पहाटे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. ही माहिती गावात व परीसरात पोहचल्याने वाघाला पाहायला गर्दी झाली. यात मालेवाडा येथील मोरेश्वर चौधरी (३५) हा वाघ लपून असलेल्या जागेकडे गेल्याने वाघाने पंजाचा तडाखा देत त्याला जखमी केले. पाहा व्हिडिओ
- ठाणे - मुंब्रा रेतीबंदर खाडी परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि पालिका आपत्ती व्यवस्थापनाची टीम पोहोचली असून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दरम्यान, हा मृतहेह नौपाडा परिसरातील ज्वेलर्स भरत जैन यांचा असल्याची माहिती आहे. मात्र, ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वाचा सविस्तर...
- काबुल - अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींचा क्रूर चेहरा समोर येत आहे. तालिबानींनी अल्पसंख्यांक नागरिकांना ठार केल्याचे रिपोर्टमध्ये आहे. शुक्रवारी इमामांनी प्रार्थनेनंतर एकीचे आव्हान केले आहे. असे असले तरी यापूर्वी सत्तेत असताना तालिबानने केलेल्या छळाच्या आठवणी पुन्हा नागरिकांच्या मनात ताज्या झाल्या आहेत. वाचा सविस्तर...
मुंबई - मंत्रालयासमोर विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न पुण्यातील आंबेगाव येथील सुभाष जाधव यांनी केला आहे. त्यांना पोलिसांनी तातडीने मुंबईतील जीटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर...
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
- 21 ऑगस्ट राशीभविष्य : आज 'या' राशीवाल्यांना मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 ऑगस्ट : कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या
- आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी