डेहराडून - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथील हिमस्खलन दुर्घटनेनंतर अजूनही बचावकार्य सुरुच आहे. यातच पुन्हा एक झटका उत्तराखंड वासीयांना मिळाला. पिथौरागडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4 नोंदविली गेली. तसेच भूकंपात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
उत्तर भारतामधील पाच राज्यांना गेल्या शुक्रवारी म्हणजेच 12 फेब्रुवरीला रात्री साडेदहाच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला होता. दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदीगड आणि हरियाणा या पाच राज्यांमध्ये भूकंप झाला होता. देशातील पाच राज्यांसह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातीलही काही भागांमध्ये देखील भूकंपाचे तीव्र झटके जाणवले होते.