ETV Bharat / bharat

Video : फाटलेल्या जीन्सनंतर आता तीरथ सिंह यांचे शॉटर्सवर वादग्रस्त विधान

author img

By

Published : Mar 19, 2021, 7:08 PM IST

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा पुन्हा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. महिलांनी शॉटर्स घालण्यासंदर्भात त्यांनी वादग्रस्त विधान केलेय.

सिंह
सिंह

नवी दिल्ली - उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना फाटलेल्या जीन्सवरील विधान त्यांना चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. यातच तिरथ सिंह यांचा पुन्हा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. आपल्या कॉलेज काळातील एक आठवण सांगताना महिलांनी शॉटर्स घालण्यासंदर्भात त्यांनी विधान केलंय. या विधानामुळे ते पुन्हा टीकचे धनी होऊ शकतात.

Video : फाटलेल्या जीन्सनंतर आता तीरथ सिंह यांचे शॉटर्सवर वादग्रस्त विधान

तिरथ सिंह यांनी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या एका कार्यक्रमात बोलताना फाटक्या जीन्सवर वक्तव्य केले होते. त्याच कार्यक्रमात त्यांनी आपल्या कॉलेज काळातील एक प्रसंग सांगितला. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

श्रीनगर विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी चंदीगढमधून एक मुलगी आली होती. ती हाफ कट ड्रेस (half cut dress) घालायची. तेव्हा पूर्ण विद्यापीठातील मुले तीच्या मागे-पुढे फिरायची आणि तीची खिल्ली उडवायची. विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येता, की अंगप्रदर्शन करण्यासाठी, काय होणार या देशाचे, असे त्यांनी म्हटलं.

फाटलेल्या जीन्सवर विधान -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भगवान रामशी तुलना केल्यानंतर आता महिलांनी जीन्स घालण्याबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे कसले संस्कार आहेत? या महिला आपल्या मुलांना काय संस्कार देतील, असे विधान त्यांनी केले आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुले-मुली फाटलेली जीन्स घालतात. या प्रकारचे वातावरण योग्य नाही. हे ब्रिटिशांचे अनुसरन करत आहेत. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, ज्या मुलाला संस्कार आहे. तो कधीही अपयशी ठरू शकत नाही, असे ते म्हणाले होते. त्यांचे विधान वादात पडताना दिसत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - वक्तव्याचा विपर्यास केलायं, मुख्यमंत्री तिरिथसिंह रावत यांच्या पत्नीची सारवासारव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.