ETV Bharat / bharat

Goa Election 2022 : गोव्यात देवेंद्र फडणवीस लागले प्रचाराला

author img

By

Published : Jan 30, 2022, 3:32 PM IST

सध्या गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Election 2022 ) पार्श्वभूमीवर प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. यात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Started Campaigning ) हे देखील मागे नाहीत. असाच डिचोली मतदारसंघात ( Bicholim Constituency ) प्रचार करताना फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Chief Minister Dr. Pramod Sawant ) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे ( BJP State President Sadanand Tanavade ) यांनी एका स्थानिक हॉटेलमध्ये चहा, नाश्ताचा आंनद घेतला.

छायाचित्र
छायाचित्र

पजणी (गोवा) - सध्या गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Election 2022 ) पार्श्वभूमीवर प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. या प्रचारकाळात नेते आणि कार्यकर्ते तहान भूक विसरून कामाला लागले आहेत. मात्र, यात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Started Campaigning ) हे देखील मागे नाहीत. असाच डिचोली मतदारसंघात ( Bicholim Constituency ) प्रचार करताना फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Chief Minister Dr. Pramod Sawant ) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे ( BJP State President Sadanand Tanavade ) यांनी एका स्थानिक हॉटेलमध्ये चहा, नाश्ताचा आंनद घेतला.

2017 ची डिचोली मतदारसंघ निवडणूक - 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार राजेश पाटनेकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे उमेदवार नरेश सावळ यांचा पराभव केला. पाटनेकर यांना त्या निवडणुकीत 10 हजार 645 तर 9 हजार 988 मते मिळाली होती. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व आमदार तथा विधानसभा सभापती राजेश पाटनेकर हे करत आहेत.

मतदारसंघातील समस्या - मागच्या दोन ते तीन वर्षांपासून खाणकाम बंद असल्यामुळे बेरोजगारी ही येथील मुख्य समस्या आहे. खाणकाम बंद झाल्यामुळे त्यावर अवलंबून असलेले वाहतूक, जहाज बांधणी, खाणकामाची वाहतूक करणारे ट्रक यांना फार मोठा फटका बसला. यावर निगडीत सर्वच व्यवसाय बंद झाले व अनेक लोक बेरोजगार झाले. हा मतदारसंघ बहुतांशी ग्रामीण भागात असल्याने वीज आणि पाण्याची काहीशा समस्या ग्रामीण भागात आजही प्रकर्षाने जाणवतात.

मतदारसंघातील व्यवसाय - खाणकाम हा येथील मुख्य व्यवसाय आहे. पण, मागच्या काही दिवसांपासून तो बंद आहे. शेती, काजू, फळ बागायती व काजूची दारू बनविणे, भात शेती, पशुपालन, औद्योगिक वसाहत हे येथील महत्वाचे व्यवसाय आहेत.

हेही वाचा - Goa Assembly elections : गोव्यात काँग्रेस आणि भाजपची सेटींग.. लोबो निवडून आल्यावर भाजपात जातील - किरण कंडोळकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.